*भ्रमण*
निसर्गासवे
करू भ्रमण
सौंदर्य खरे
आनंद मन
बघाया जाऊ
स्थळ सुंदर
झरा,पहाडी
ते मनोहर
भेट देऊया
देव मंदिरी
स्नान करुया
नदिच्या तिरी
मज्जा येईल
करू भ्रमण
निसर्गात ह्या
जपून क्षण
प्रसन्न होई
मन मानवी
सैर जगाची
कराया हवी
लाभे आरोग्य
निरोगी तन
आस्वाद घ्यावा
सकळ जन
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post