*विषय:- बालदिन*
********************
*चाचा नेहरू*
प्रियतम अमुचे चाचा नेहरू
नमन त्यांना आज करु
जन्मदिनाला फूले वाहूनी
स्मरण त्यांचे मनी स्मरु
अंगावरती शुभ्र सदरा नेहमी
त्यावर लाल गुलाबाचे फूल
डोक्यावर शोभे टोपी छान
आवडे लहान लहान मुल
जवाहरलाल नेहरू पंतप्रधान
स्वतंत्र भारताचे झाले पहिले
देशावरती प्रेम तयांचे अती
देशसेवेत अपुले प्राण वाहिले
लहान मुलांना आवडे फार
चाचा चाचा बोलती सारे
हर्ष नेहरुंच्या जन्मदिनाला
बालदिन साजरा करुया रे
भारताच्या विकासाठी लढले
यात्रा केल्या विदेशात जाऊन
कार्य नेहरुंचे महान झालेत
अभिवादन करु गीत गाऊन.
********************
*✍🏻 सौ.हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post