*पेरणी*
(अष्टाक्षरी रचना)
करू शब्दांची पेरणी
अर्थ निघतील छान
वाढविता शब्दसंच
वाढे अक्षरांचे ज्ञान
जोडा अक्षरांची माळ
योग्य वेलांटी उकार
लावूनिया अलंकार
मिळे शब्दांना आकार
शब्द गुंफण करता
उमलेल काव्यफुल
मनातील भावनांना
पडे अलवार भूल
नाते जुळते शब्दांनी
करा बांधणी शब्दांची
चिंता मिटे जीवनाची
साथ सख्यासोयर्यांची
शब्द जपून बोलता
जुळतात दोन मन
नाते हेच माणसाच्या
आयुष्याचे खरे धन
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post