*नितिमत्ता*
समाजात वागणूक
व्यवहार नितिमत्ता
दिसताच माणसाची
वाढवून देते सत्ता
प्रामणिक एक गुण
नितिमत्ता असे नाव
अवलंब जीवनात
वाढवून देई भाव
सदा विचार चांगले
आचरण शुद्ध छान
मानवाची उंचावेल
समाजात फार मान
नको हेवा राग द्वेश
स्वच्छ निर्मळ निती
बुद्धिमत्ता नितिमत्ता
ठेवा होईल प्रगती
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post