*******************************
*नम्रता*
मानवीय सदगुण
वागण्यात जाणवते
नम्रपणे वागणारा
समजदार वाटते..1
व्यवहार नम्रतेचे
देई नविन ओळख
व्यक्तीमत्व समजावे
सामाजिकता पारख..2
बोलण्यातून उमजे
येई दिसून योग्यता
जग जिंकण्याचे बळ
सदगुण हा नम्रता..3
शांत स्वभावाचा व्यक्ती
गुण दिसतो नम्रता
राग , लोभ ,अंहकार
ठेवी सदैव दूरता..4
ठेवी जोडून माणसे
बोल माणसाचे गोड
शब्द नम्रतेचे सदा
सुटतात सारे कोड…5
सदगुण बाळगावा
हीच खरी मानवता
होई जगणे सरल
गुणी स्वभाव नम्रता…6
******************************
**हर्षा भुरे,*
*भंडारा**















Discussion about this post