धामणगाव रेल्वे | समृद्धी महामार्ग कर्मचाऱ्यांना दिवाळी पगार न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता व त्यामुळे समृद्धी महामार्गावरील धामणगाव रेल्वे दिवाळी असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी धामणगाव रेल्वे टोल आय.सी .ओ 6 टोल नाक्यावर सकाळी 8 वाजता काम बंद आंदोलन केले. त्यामुळे ऐन दिवाळीत समृद्धीवरील वाहतूक बिना टोल झाली .
व समृद्धी महामार्ग कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांच्या मागण्या की त्यांना नियुक्त प्रमाणपत्र देण्यात यावे व सॅलरी स्लिप देण्यात यावी व पगाराची तारीख निश्चित करावी लोकल कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे व धामणगाव मतदार संघातील बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी टोल टोल नाक्यावरील बुथमध्ये एसी लावण्यात यावे या कर्मचाऱ्यांना वास्तविक 280 प्रति प्रति दिवस मिळत असल्यावर सुट्टी घेण्यास मनमानी पैसे कपात करण्यात येते जसे 320 ते 350 रुपये कापण्यात येते रिकामी असलेले पद भरण्यात यावे एक महिना पंधरा दिवस झालेले असताना सुद्धा पगार मिळाला नाही दिवाळीच्या अगोदर पगार होईल असे आश्वासन देऊन सुद्धा दिवाळी होऊनही अजून पर्यंत पगार झालेला नाही त्यामुळे या टोलवर वसुली पूर्णपणे बंद झाली होती दरम्यान सहाय्यक व्यवस्थापक यांनी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला..
Discussion about this post