सचिन मून ता. प्रतिनीधी धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे:- दिवाळी हा सण आनंद व उत्साहाचा असतो. दिवाळीला फराळ गोडधोड नवीन कपड्याची परवणीच असते. परंतु सर्वांनाच दिवाळीला फराळ गोडधोड कपडे मिळतेच असे नाही.
रस्त्यावरील निराधार मनोरुग्ण व बेवारस लोकांची दिवाळी कशी असेल , ही कल्पनाच प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येईल. सदैव सामाजिक कार्यात धामणगाव येथील अग्रेसर असलेले हात फाउंडेशन सात वर्षां पासून दिवाळी ही बेवारास ज्यांना घरदार नाही. ज्यांनी रस्त्यावरच आपला संसार थाटलेला असतो. रस्त्यावर झोपलेले असतात अशांची दिवाळी साजरी करण्याचा मानस हात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजित भजभुजे यांनी व्यक्त केला.
मित्र परिवाराच्या सहकार्याने दिवाळीच्या दिवशी ज्यांना घरदार नाही जे रस्त्यावर बेवारस बेघर मनोरुग्ण झोपलेले असतात त्यांना दिवाळीच फराळ देण्यात आले. यात सर्व प्रथम रेल्वे स्टेशन जवळील बेघर नागरिक, नंतर शास्त्री चौक, भगतसिंग चौक ,ग्रामीन रूग्णालय मधील रुग्णांना सुद्धा फराळ देण्यात आले व बेवारस मनोरुग्णांना बेघर नागरिकांना कपडे व थंडी असल्यामुळे ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.बेघर व बेवारस नागरिकांना च्या चेहर्यायावरील स्मित हास्य व आनंद पाहून खरच मन भारावून येत .
तसेच रेल्वे स्टेशन कर्मचारी, बस स्थानक कर्मचारी , पोलीस स्टेशन कर्मचारी यांना सुद्धा हात फाऊंडेशन तर्फे दिवाळीच फराळ देण्यात आले अशा प्रकारे सात वर्षां पासून हात फाउंडेशनच व मिञ परिवार दिवाळी साजरी करतो या वेळेस हात फाउंडेशनच्या पुर्ण टीम चे सहकार्य लाभले.
Discussion about this post