*तुळशी विवाह*
कार्तिक महिना
शुल्क एकादशी
शुभ तिथी सुरू
विवाहा तुळशी
हिंदू संस्कृतीत
पूजा रोज वृंदा
कार्य सिद्ध होई
अर्पिता मुकुंदा
सजवू तुळस
रंग रंगोटीने
अंगणाची शोभा
छान रांगोळीने
शालीग्राम विष्णू
संगे हा सोहळा
सोबतीला बोर
भाजी नी आवळा
मंडप ऊसाचा
सजवला छान
हिरवी तुळसी
हरपले भान
अंर्तपाट लावू
मंगला अष्टक
अक्षदा फुलांचा
सोहळा हा एक
आरती ओवाळू
सारे आनंदात
फळे दहिकाला
ठेवू प्रसादात
सोहळा सुंदर
तुळशी विवाह
घरोघरी होई
गृहिणीची वाह
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post