ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी
मोदी- राहुल यांनी केले अभिनंदन
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी त्यांना आवाजी मतदानाने विजयी घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधीही नवीन स्पीकर बिर्ला यांना आसनापर्यंत सोडायला गेले. स्पीकर म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत राहुल गांधीही पोहोचले. राहुल यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि नंतर पंतप्रधानांशी हस्तांदोलन केले.
1976 नंतर देशात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने उमेदवार उभा केल्याने लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या ओम बिर्ला यांनी निवडणुकीत बाजी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला.
——————-
तब्बल दहा वर्षांनी लोकसभेला मिळाले विरोधी पक्षनेते
कॉंग्रेस नेते राहुल गांधीं यांची विरोधीनेते पदी निवड
कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनी लोकसभेला मिळाले विरोधी पक्षनेते मिळाले . काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी काल मंगळवारी झालेल्या इंडि आघाडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांनी पत्र पाठवून याबाबत कळवण्यात आलेय. खर्गे यांच्या घरी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती कळवण्यात आली . इतर पदाधिकाऱ्यांबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असे वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) 9 जून रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर काल , मंगळवारी खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
—————-
राज्यातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान
प्रवीण दरेकर, किशोरी पेडणेकर, किरण शेलार यांनी बजावला हक्क
लोकसभेनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. या चारही
——–
डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण
पुण्यातील आरोग्य प्रशासन कामाला लागले
पुण्यात झीका आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत. कोथरूडच्या एरंडवणे भागातील एक ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत. पुण्यात प्रथमच झीकाचे रुग्ण आढळले आहेत.झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.
———-
फडणवीस यांच्या एका फोनने सुटका
मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार
जालना शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. शहरातील १३ वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केले आणि त्यानंतर २ तासांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली.
केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली याचिका
हायकोर्टाच्या 21 जूनच्या निर्णयाला दिले होते आव्हान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाच्या 21 जून रोजीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलेल्या जामीनाला अंतरिम स्थगिती दिली होती.केजरीवाल यांचे वकील अभिषेक मुन सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली, ती मान्य करण्यात आली.
Discussion about this post