जीवनसाथी असावा
सुख दुःख समजणारा
वेळ असो कोणतीही
खंबीर पाठिशी राहणारा
समजूतदार असावा
चारचौघात देई मान
दोन गोड शब्द प्रेमाचे
नको कधी ओढतान
विचार नेहमी स्वच्छ
वागणूकीत असावा साधा
दोघांचा विश्र्वास एकमेका
जसं शोभे कृष्णाची राधा
बंधनात न ठेवता कधी
मुक्तपणे वागवणारा
तब्येत बिघडली की
खूप काळजी घेणारा
फुलाप्रमाणे जपणारा
मनातलं सर्व समजणारा
जीवनसाथी सर्वांना हवा
मरत पर्यंत साथ देणारा
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post