*जातं*
जुन्या संस्कृतीचा वसा
आठवण करू जातं
दळणाची पुरातन
पीठ गिरणीशी नातं…१
प्रात:वेळी उठूनिया
ओव्या गाऊन सुंदर
उदरनिर्वाहासाठी
फिरे जातं घरोघर…२
एक खजिनाच जणू
भारतीय जूना वसा
घर्रघर्र आवाजात
दोन चिपड्यांचा पसा…३
एकविसाव्या शतकी
नाही कुणाकडे जातं
दळणाच्या मशिनीने
विसावले जुने पातं…४
गोल गोल चक्राकार
जणू एक सुदर्शन
धडा शिकवून नवा
चालविले जे जीवन….५
धावपड रोजचीच
झिज होई जात्यासम
आठवणी डोळ्यापुढे
जीवनाचे चाले कर्म….६
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post