चला जाऊ पंढरी ला””
चला विठू दर्शनाला

चला जाऊ पंढरीत
मुख दर्शनाने सुख
भक्त सारे आनंदीत
चला पाहू पांडूरंग
वास त्याचा पंढरीत
विठू उभा विटेवर
लीन होऊन भक्तीत
गळा तुळशीची माळ
हास्य मुख मनोहर
रूप सावळे गोजीरे
मुर्ती दिसते सुंदर
भक्त पुंडलिकासाठी
आला धावत श्रीहरी
दिसे भक्ती ही अनोखी
धन्य पंढरी नगरी
टाळ चिपड्यांचा नाद
विठू नामाचा गजर
चला जाऊ पंढरीत
वृंदा घेऊ डोईवर
मेळा भरला पंढरी
एकादशी पुण्य तिथी
भजनात होई गुंग
संत झालेत अतिथी
चला जाऊ पंढरीत
खेळ खेळूया फुगडी
वारकरी होऊनिया
चला होऊ सवंगडी

*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post