*ग्रामपंचायत..*
गावातील ग्रामपंचायतीला
विसर पडला कामाचा
जनता सोडली वाऱ्यावर
विचार करतात स्वतःचा
ग्रा. पं. प्रशासन म्हणतात
कामे नियमित होणार
पण वारंवार सांगून ही
ते लक्षच नाही देणार
कामे गावची चालू असता
ग्रामपंचायत दखल ना घेई
कामं ही कशाला बघायचे
हरकत ही कुणा नाही
ज्या कामात फायदा असते
तेच कामे करतात
काम अर्धवट सोडून
आपआपले खिशे भरतात
ग्रामसभा भरली की
एकमेकांकडे बोटे दाखवतात
मुळ प्रश्न सोडून देती
भलतंच विषय हाताळतात
गावच्या विकासाचा पडला
गावाकऱ्यांना विचार
भ्रष्टाचारी लोकांमुळेच
गरीब झाला आता लाचार
शासनाकडून मिळते
गरिबांना घरकुल योजना
पण ५०-१०० दिल्याशिवाय
आता घरकुल कुणा मिळेना
गावातला विकास
असं नाही होणार
जो पर्यंत गावकरी
एकत्र नाही येणार
*✍️ अजय राऊत*
*मो. नं.8999661685*
Discussion about this post