शहरात १४ फुट उंच शिवाजी महाराजांच्या मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठा
गोंदिया शहरात आज १४ फूट उंच छत्रीपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असून हि मूर्ती नाशिक येथून गोंदियात आणण्यात आली होती गोंदियातील आदित्य सावंत या तरुणाने मराठा समजला हि मूर्ती भेट दिली असून पाच दिवसाच्या विविध कार्यक्रमा दरम्यान आज या मूर्तीची विधिवध पूजा करून हि मूर्ती स्थापित करण्यात आली आहे तर शहरात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीच्या स्थापने साठी मागील ३५ वर्षा मागणी प्रलनबीत होती. या कडे कुणीही लक्ष देत नव्हते शेवटी गोंदिया शहरातील सावंत किटुबियांच्या तसेच मराठा समाजाच्या पुढाकाराने हि मूर्ती गोंदियात यावर्षी स्थापित करण्यात आली असून मराठा समाजाच्या वतीने मागील पाच दिवसा पासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात पोवाडे ,गोंधळ ,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज माजी मंत्री परिणय फुके ,मराठा समाजाचे नेते अशोक इंगळे तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित असून शेकडो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर पुष्प अर्पण करून शिवरायाना वंदन केले तर ही भव्य मूर्ती १४ फूट उंच असुन फायबर ऑपटीकने बनलेली असल्यामुळे १५० वर्ष या मूर्तीची गॅरेंटी असून वजन सुद्धा कमी आहे. तसेच मूर्ती चा सोंदर्य देखण्या जोगा असून ज्या ठिकाणी या मूर्तीची संथपणा करण्यात आली आहे त्या ठिकाण मराठा समाजाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव दिल्याने मराठा समाजाने आनंद व्यक्त केला
Discussion about this post