धामणगाव रेल्वे –

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय कार्यशाळा आयोजित* श्रीराम कला महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या वतीने डॉक्टर आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्यामार्फत कार्यशाळा आयोजित केली होती आधुनिक काळातील स्त्री चळवळ यावर व्याख्यान आयोजित केले होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख होते डॉक्टर सोनटक्के सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राऊत सर व समतादूत सरोज आवारे यांनी फोटोचे पूजन करून हा रात पण केले त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मोनाली इंगळे त्यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितले त्यानंतर प्रमुख होते प्राध्यापक डॉक्टर कुसुमेंद्र सोनटक्के यादव देशमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तिवसा यांनी स्त्रियांवर अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले याची स्त्री ही इतकी प्रगती करू शकली त्यासाठी सावित्रीबाई फुले यांची कामगिरी किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून सांगितले त्याचबरोबर अतिथी म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग बार्टी अंतर्गत समतादूत सरोज आवारे यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास किती खडतर होता हे समजून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राऊत सर होते त्यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. टीना सराटे हिने केले तर आभार प्रदर्शन कु. उज्वला मेश्राम हिने केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच बहुसंख्या विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली

Discussion about this post