*आरसा*
रुप रंग दाखवतो
दाखवतो कधी हास्य
आरशास कसे कळेल
कळेल मनातले रहस्य
बाह्यरूप साधे भोळे
भोळे दिसती चेहरे
आरशाला कुठे ठाऊक
ठाऊक आतील पेहरे
कधी हासवतो आरसा
आरसा हा एक प्रतिबिंब
घरी खिळावर सजलेला
सजलेला हिरवा कडुलिंब
रंगहिन जरी असे तो
तो दाखवतो जगातले रंग
आरशाविना कधी कळेना
कळेना स्वतःचे रुप तरंग
आरशा समोर बसून कधी
कधी निहारावे स्वतःला
सत्याची जाणीव करून देई
देई आनंद सर्वांच्या मनाला
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post