आई मायेचा सागर
आई कल्पवृक्ष खांब
सांभाळते पूर्ण घर
सहनशीलता देवी
आई मायेचा सागर
दुःख लपविले तिने
गाठ बांधून पदर
हास्य चेहर्यावर हो
आई मायेचा सागर
हसतखेळत करी
सुख देऊन संसार
आई जननी सुखाची
आई मायेचा सागर
भय न उन्हातान्हाचा
भरी कष्टाची घागर
धडपड जीवनात
आई मायेचा सागर
प्रेम मुला बाळांवर
वात्सल्याचा ती पदर
लपवते अश्रुधारा
आई मायेचा सागर
तळमळ सुखासाठी
फुलविते ती संसार
फुलराणी खरी तीच
आई मायेचा सागर
आई वंदन तुजला
कसे फेडू उपकार
घास दिला साखरेचा
आई मायेचा सागर
जन्मदाती जननी गं
तूच खरी गं ईश्वर
आशिर्वाद तुझा सदा
आई मायेचा सागर
किती वर्णू तुझे गुण
घडविते तू संस्कार
राही सोबत पाठीशी
आई मायेचा सागर
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post