दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सतर्फे टेलिमेडिसिन सेंटर
नागपूर, – दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने आयएमएएस हेल्थकेअर आणि द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिक यांच्यासोबत भागीदारी करत, दुर्गम आणि दुर्लक्षित समुदायासाठी टेलिमेडिसिन सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे, रुग्णांना तज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सल्लामसलत घेता येईल. या प्रकल्पाचा उद्घाटन नागपूरमध्ये क्लीव्हलँड क्लिनिकचे प्रख्यात पल्मोनरी क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. अखिल बिंद्रा, दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुप मरार आणि कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. Dutta Meghe Group of Hospitals launches Telemedicine Center in association with IMAS Healthcare and Cleveland Clinic
डॉ. अखिल बिंद्रा यांनी या उपक्रमाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले, “कोविड-19 महामारीनंतर भारतात आरोग्य सेवा अधिक सुलभ करणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या टेलिमेडिसिन सेवा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधण्याची सुविधा देईल. यासोबतच, लसीकरणामुळे जनतेच्या रोग प्रतिकारशक्तीला चालना मिळाल्याने, भविष्यात आलेल्या क्षयरोग आणि एच 1 एन 1 सारख्या आजारांविरुद्धच्या लढाईतही मदत होईल.”
क्लीव्हलँड क्लिनिकच्या इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख दीपिका ग्रांधी यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना, “हा टेलिमेडिसिन सेंटर नागपूरकरांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देईल. आजाराची लक्षणे दिसल्यावर त्वरित उपचार घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असे सांगितले.
दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे डॉ. अनुप मरार म्हणाले, “या टेलिमेडिसिन सेंटरमुळे नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रातील रुग्णांना उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होईल. रुग्णांना घरबसल्या तज्ञ डॉक्टरांशी आभासी सल्लामसलत मिळेल, ज्यामुळे त्यांचा उपचाराचा अनुभव अधिक सुलभ आणि प्रभावी होईल.”
हा प्रकल्प, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या टेलिमेडिसिन सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचवून, प्रिव्हेंटिव्ह केअर, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चांगल्या आरोग्य व्यवस्थापनाच्या संधी वाढवण्यात येणार आहेत. Dutta Meghe Group of Hospitals launches Telemedicine Center in association with IMAS Healthcare and Cleveland Clinic
Discussion about this post