• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, June 6, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Entertainment

येथे आता नि:शुल्क चित्रपट शुटींग करता येणार; मुनगंटीवार यांची घोषणा

Khabarbat™ by Khabarbat™
February 11, 2024
in Entertainment, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

*आयफा फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता मराठी चित्रपट उत्सव*
– *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*

*दुस-या चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन*

वाचण्यासारखी बातमी

कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला Bigg Boss

समुद्राच्या पोटात जीव मुठीत

जिंकलो तर माजायचं नाही आणि हरलं तर ….विश्रांती न घेता लागले कामाला

सुधीरभाऊंच्या स्वागताची गर्दी बघून “वसंतराव नाईक” यांची झाली आठवण

*फिल्मसिटीच्या बाहेर महाराष्ट्रात आता नि:शुल्क शुटींग*

*चंद्रपूर, दि. 11* : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याच्या कथानकामध्ये एक अद्भूत शक्ती असते. डॉक्टरपेक्षा चित्रपटाच्या डायरेक्टरचा हात प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोहचतो. अशी चित्रपटसृष्टी राज्यात टिकली पाहिजे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता भव्यदिव्य मराठी चित्रपट उत्सव सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर येथील मिराज सिनेमा येथे दुस-या चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रसिध्द दिग्दर्शक तथा पुणे फिल्म फेस्टीवलचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर यांच्यासह हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.
भाषेपूर्वी अभिनयातून संवाद साधला जात होता, असे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले,

1913 मध्ये आलेला ‘राजा हरीशचंद्र’ हा चित्रपट मूकपट होता. अभिनयातून तो प्रेक्षकांना कळला. 1932 मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट आला. वैशिष्ट म्हणजे अयोध्येशी चंद्रपूरचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे सागवान गेले असून कुठल्याही भाविकाला अयोध्या येथे दर्शनासाठी चंद्रपूरच्या लाकडाच्या दरवाज्यातूनच जावे लागेल, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.

पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे गत दोन वर्षापासून फिल्म फेस्टिवल चंद्रपूरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्हा हा खनीज आणि कोळसाकरीता प्रसिध्द आहे. कोळसा खाणीत हिरा सापडतो तसे चंद्रपूरमध्ये अभिनयातील कोहीनूर आहेत. जयंत सोमलकर, ‘एका रात्रीचा पाऊस’ या चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिष्ठा ताई ह्या चंद्रपूरच्या आहेत. आपल्या जिल्ह्यात कलाकारांची कमी नाही, त्यांना संधी मिळवून दिली तर नक्कीच ते संधीचे सोने करतील, त्यासाठीच चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल घेण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून येथील कलाकार प्रेरणा घेऊन अभिनय, दिग्दर्शन, निर्माता या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. येथील कलाकाराला राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्ड मिळावा व चंद्रपूरची शान जगामध्ये वाढावी, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

*सुधीरभाऊंनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला : दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल*
चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे हे दुसरे वर्ष आहे. चंद्रपूर आणि आजुबाजूच्या परिसरात चित्रपटाच्या शुटींगकरीता लागणारे सुंदर लोकेशन आहे. येथेही अभिनेते आणि दिग्दर्शक घडावे, याासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला, असे गौरवोद्गार प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले.
पुढे ते म्हणाले, जगातील सामाजिक आशय आजचा तरुण टिपत आहे. समाजामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी यावर्षी पांढरे कबुतर हे चित्रपट महोत्सवाचे बोधचिन्ह ठेवले आहे. मुंबईबाहेर चंद्रपूर, लातूर, औरंगाबाद येथेही पुणे फिल्म फेस्टीवलचे आयोजन होत आहे. या तीन दिवसात चंद्रपूरकरांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी पालकमंत्री सुधीरभाऊंनी उपलब्ध करून दिली आहे, याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. कारण सुधीरभाऊंमध्ये उत्कृष्ट रसिकता असल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही डॉ. जब्बार पटेल म्हणाले.

*मुंबईच्या फिल्मसीटी बाहेर चित्रपटाची शुटींग नि:शुल्क* : मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शुटींगसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
*75 नाट्यमंदिराची निर्मिती*: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच नाट्य परिषदेचे हे 100 वे वर्ष असल्यामुळे राज्यात 75 नाट्यमंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 9 कोटी 33 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

*फिल्मसिटीत सर्व सुविधा उपलब्ध होणार* : मुंबई येथील फिल्मसिटी 521 एकरमध्ये आहे. तसेच त्यालगत 104 चौ. किमी. मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी चित्रपटासाठी लागणा-या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

*मान्यवरांचा सत्कार* : यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर, मिराज सिनेमाचे रौनक चोरडीया यांचा सत्कार करण्यात आला.

Post Views: 733
Tags: entertainmentmumbaiSudhir mungantiwar
SendShareTweetScan
Previous Post

हडस्तीत जगन्नाथबाबा पालखी सोहळ्याला भाविकांची गर्दी पंचक्रोशितील तब्बल ४० भजन मंडळांचा सहभाग

Next Post

आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
Load More
Next Post
आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा 

आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा 

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL