Selection of 14 students in army and police department under the guidance of visually impaired trainers.
श्री. छत्रपती क्रीडा अकॅडमीचे प्रशिक्षक पाशा शेख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत -घवघवीत यश मिळविले आहे. दृष्टीहिन मुख्य प्रशिक्षक पाशा शेख यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. त्यांचे कर्तृत्व हे डोळस समाजाला प्रेरणादायी ठरलेले आहे. त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. आर्मी व पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती क्रीडा अकॅडमी द्वारे आयोजित कार्यक्रमात अकॅडमीचे अध्यक्ष, मुख्य प्रशिक्षक पाशा शेख, आनंद चलाख, तालुका युवक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजेश्वर ढवस, मुनिब शेख यांची उपस्थिती होती.
विविध पदाच्या पात्रता परिक्षेत तालुका क्रीडासंकुल राजुरा येथे विद्यार्थ्यांकडून नियमित सराव घेणाऱ्या श्री. छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या १४ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे. त्यांचे मार्गदर्शक छत्रपती क्रीडा अकॅडमीचे अध्यक्ष पाशा शेख व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. या क्रीडा अकॅडमी मध्ये रुजू झालेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खर्च उचललेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश गाठले. आर्थिक अडचण असताना सर्व खर्च उचलून आधार दिल्यामुळे अरुण धोटे आणि पाशा शेख यांचे यशस्वी विद्यार्थ्यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या वतीने अरुण धोटे यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन गौरव केला.
पाशा शेख यांनी तारुण्यावस्थेत दृष्टी गमावल्यानंतर परिस्थितीला हार न मानता क्रीडा क्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. येथील तालुका क्रीडासंकुलावर दररोज सकाळी शेकडो विद्यार्थ्यांना फिजिकल फिटनेसचे धडे देत आहेत. दृष्टिहीन असूनही विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सकाळपासून विविध व्यायामाच्या माध्यमातून त्यांना
घडविण्याचा ध्यास सुरुवातीपासून आहे.
बालपणापासून अॅथलेटिक्सकडे वळण्याची इच्छा असलेल्या पाशा शेख यांनी आपल्या हातून चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण व्हावे, हे ध्येय उराशी ठेवून स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. स्वतः दृष्टी नसलेल्या पाशा शेख यांनी नियतीला हार न मानता तरुणांना डोळसपणे आलेल्या संघर्षाला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करीत आहेत. यात अनेक युवक आणि युवती त्यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक विद्यार्थी शासनाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. 2023 मध्ये श्री छत्रपती क्रीडा ॲकॅडमीचे तब्बल 14 विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात नियुक्त झालेले आहेत. यात मुलींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तरुणांना दिशा देण्यासाठी त्यांचे प्रेरणादायी कर्तृत्व समाजाला ऊर्जा देणारे आहे.
नुकत्याच झालेल्या परीक्षेत भारतीय सैन्य दलात अभिजीत मोहूर्ले,लोकेश वडस्कर,करण झरकर,प्रतीक आत्राम,कृपाल सिद्धमवार ,प्रतीक निलमवार यांची निवड झाली आहे.अर्धसैन्य बलामध्ये आकाश कुचनकर, श्वेता वाघमारे, यांची निवड झाली आहे तर महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये ज्योती वानखेडे, शुभांगी शतपलकर, श्रृंखला कांबळे यांची निवड झाली आहे मुंबई पोलीस मध्ये
पूजा इंदूरवार,आचल सरवर व सुवर्णा नाईकवाऱ यांची निवड झाली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. संचालन प्रकाश घुले यांनी केले.
Discussion about this post