*नागपुर ची मुस्कान मुंबईत चमकली …*
सर्वोत्कृष्ट शिस्त पालन पुरस्काराणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा गौरव
सुमित ठाकरे/नागपुर
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एस.टी कला व वाणिज्य महाविद्यालय, उल्हासनगर मुंबई येथे दि 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत प्रेरणा राज्यस्तरीय नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची (NSS) स्वयंसेवक कु मुस्कान राजू महतो या विद्यार्थिनीने S.S.T.तर्फे आयोजित राज्यस्तरीय शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत
धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेस नगर नागपूर चे नाव रोशन केल्या बद्दल विद्यापीठाचे RTMNU राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे , राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश शुक्ला,चमू सोबत गेलेल्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना पत्की , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमराज देशमुख , कार्यक्रम अधिकारी डॉ राजकुमारगिरी गोसावी , प्रा.नितीन कराळे , प्रा. रवी गुंडे, प्रा. राधा काळे, प्रा. रंजना गोसावी, विनोद हजारे, खुशी डुरुगकरया या सर्वांच्या हस्ते तिचा सत्कार करून गौरविण्यात आले आणि आशीर्वादाची थाप देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post