MSCE Pune Scholarship 2025 8th and 5th Class: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग पूर्णतः सज्ज झाला असून, विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
अर्जुनीमोरगाव तालुक्यात ५ वीचे ८६७ विद्यार्थी | तर ८ वीचे ५४४ विद्यार्थी होणार प्रविष्ट

संजीव बडोले प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.८.
उद्या रोज रविवारला (दि.९,) होणाऱ्या वर्ग पाचवा शिष्यवृत्ती परीक्षेला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकूण ८६७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत त्यासाठी तालुक्यातील एकूण ७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.तर वर्ग ८ वी चे एकूण ५४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.हे विद्यार्थी तालुक्यातील एकूण ५ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. यासाठी तालुका शिक्षण विभागाच्या प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती, अर्जुनी मोरगाव चे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली आहे.
यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख आणि सात विषय शिक्षकांच्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्यासाठी वर्ग पाचवीला किंवा आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या नेमणुका परीक्षा केंद्रावर करण्यात येणार नाही.तसेच परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही.यासाठी सर्व महसूल विभाग आणि अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आलेली आहे.असेही चव्हाण पुढे म्हणाले.

परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका बैठे पथक म्हणून सर्व केंद्रावर करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरावरूनही सदर परीक्षा केंद्रावर भेटी होणार आहेत.
– अनिल चव्हाण,
– गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती अर्जुनी मोरगाव.
Discussion about this post