राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा २०२५
ठरणार संविधान साक्षरतेचे पुढ चे ठोस पाऊल
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा
७२ केंद्रावर ३५०० विद्यार्थी,नागरिक देणार परीक्षा
संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.२५.
आपल्या देशात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला. संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले आणि तेव्हापासून या दिवसाला ‘संविधान दिन’ किंवा ‘राष्ट्रीय कायदा दिन’ म्हणून ओळखले जाते. यंदाचे वर्ष हे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.हे विशेष.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट भारतीय संविधानातील मूल्ये आणि तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे.
भारतीय राज्यघटनेतील आदर्श, मूल्ये व नागरिकत्वाची खरी जाण प्रत्येकापर्यंत पोहोचावी,या उद्देशाने सुजाण नागरिक मंच,रायगडच्या विद्यमाने राज्यस्तरीय ‘संविधान गुणगौरव परीक्षा २०२५’ आयोजित करण्यात आली असून, संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२५ ला ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
हे आयोजन म्हणजे संविधान साक्षरतेचे पुढ चे ठोस पाऊल ठरणार आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
संविधान गुण गौरव परीक्षा २०२५ गोंदिया जिल्ह्यात ७२ परीक्षा केंद्रावर शाळातून घेण्यात येणार असून,यासाठी ७२ केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सुमारे ३५०० विद्यार्थी,नागरिक ही परीक्षा देणार आहेत.
अशी माहिती सुजान नागरिक मंचाचे आयोजक नूरखाँ पठाण,गोंदिया जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व संविधान गुण गौरव समितीचे राज्य अध्यक्ष अनिल मेश्राम व गोंदिया जिल्हा समन्वयक महेंद्र चंद्रिकापुरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
संविधानाची सामाजिक, आर्थिक व राजकीय क्रांती समजून घेण्यासाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.संविधान साक्षर नागरिक तयार करण्याच्या दिशेने
हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
राज्य स्तरावर प्रथम-पाच हजार,करंडक,
द्वितीय : तीन हजार, करंडक,
तृतीय : दोन हजार, करंडक
उत्तेजनार्थ : एक हजार (दोन विजेते)
केंद्र स्तरावर : सुवर्ण, सिल्व्हर व ब्राँझ पदक व सर्व परीक्षार्थीना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
- अभ्यासक्रम.
- लहान व मध्यम गट : प्राथमिक माहिती, अनुच्छेद ५१ (क) पर्यंत
- मोठा गट : प्राथमिक माहिती, अनुच्छेद १०० पर्यंत.
- सर्व परीक्षार्थीना अभ्यासासाठी पीडीएफ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, छापील प्रश्नपत्रिका व प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- परीक्षेचे स्वरूप.
- परीक्षा तीन गटांत : लहान : आठवीपर्यंत,
- मध्यम : नववी ते बारावी,
- मोठा/खुला गट : बारावीनंतर सर्वांसाठी
- परीक्षेचे माध्यम : मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू.
- कालावधी : एक तास
- प्रश्नपत्रिका : ४५ बहुपर्यायी प्रश्न, पाच लघूत्तरी प्रश्न, एकूण १०० गुण
- निकाल घोषणा : १२ जानेवारी २०२६
- बक्षीस वितरण समारंभ: २२ जानेवारी २०२६.
- परीक्षा फी सर्व गटांसाठी: पन्नास रुपये, पुस्तकासह नोंदणी (ऐच्छिक), लहान/मध्यम:१५० (पुस्तक फी),
- मोठा गट:३०० (पुस्तक फी).
- ———–
















Discussion about this post