प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा तालूक्यातून प्रथम
निफंद्रा: शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या दिनांक 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करीता “मुख्यमंत्री सुंदर शाळा, स्वच्छा शाळा” हे अभियान दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले होते.
या अभियानात विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण आणि शाळा व्यवस्थापकाकडून आयोजित उपक्रम आणि घटकांचा सहभाग 40 गुण असे 100 गुणांची स्पर्धा होती.
या स्पर्धेचा तालुका स्तरीय शाळा मूल्यांकन निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये खाजगी व्यवस्थापनातून अष्टविनायक बहूउदेशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा ने प्रथम क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक विजय आडेपवार, संस्थेचे सचिव रवींद्र आडेपवार आणि प्रविणभाऊ आडेपवार यांच्या हस्ते मुख्याध्यापक रवींद्र कूडकावार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भक्तदास डहलकर, सदस्या मीनाक्षी फुलझेले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कल्पना ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक गोविंदां बुरांडे यांनी तर आभार सहा. शिक्षक प्रदीप दोडके यांनी मानले.
शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी अभियान आणि यशाबद्दल कौतुक केले आहे.
Discussion about this post