‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन
नागपूर : टी. जी. पी. सी. ई. टी., नागपूर येथील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बायोफ्यूजन–2K25’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक कार्यक्रमाला विद्यार्थी आणि तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात जीवनविज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मसी आणि अभियांत्रिकी या विविध शाखांतील स्नातक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मंगल प्रार्थनेने झाली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंद शिनखेडे (उपप्राचार्य, दादा रामचंद्र बाखरू सिंधू महाविद्यालय) यांनी उपस्थित राहून बायोटेक्नॉलॉजीमधील बदलत्या संधी व संशोधनाच्या नवीन दिशा यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. पी. एल. नक्टोडे (TGPCET) यांनी उद्घाटनपर भाषणात नवकल्पना व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. प्रगती पाटील, प्रो. अनुप बगडे व डॉ. रोहित काळनेके यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले –
पेपर प्रेझेंटेशन : विद्यार्थ्यांनी त्यांच्या अद्ययावत संशोधन निष्कर्षांचे प्रभावी सादरीकरण केले.
मॉडेल मॅनिया : विविध सर्जनशील व वैज्ञानिक मॉडेल्सच्या माध्यमातून कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आल्या.
आयडिया पिचिंग : नाविन्यपूर्ण कल्पनांची सादरीकरणे तज्ज्ञ समितीपुढे करण्यात आली.
अगर आर्ट : विज्ञान आणि कला यांचा संगम ‘अगर प्लेट’वर रेखाटण्यात आला.
विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. समारोप समारंभात डॉ. किरण भुयार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी TGPCET चे व्यवस्थापन, माननीय अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड-पाटील, उपाध्यक्ष आकाश गायकवाड-पाटील, कोषाध्यक्ष डॉ. संदीप गायकवाड, प्राचार्य डॉ. पी. एल. नक्टोडे व उपप्राचार्य डॉ. प्रगती पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘बायोफ्यूजन–2K25’ हा दिवस सर्जनशीलता, नवकल्पनांचा जागर, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शैक्षणिक प्रेरणेने परिपूर्ण ठरला.
Discussion about this post