चंद्रपूर-शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास व समूह शाळेच्या नावाखाली गोरगरिबांच्या शाळा बंद करण्याला विरोध दर्शवत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री यांना राज्यभरातून निवेदन पाठविण्यात आली. चंद्रपूर येथे मा.सुधाकर अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग व संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या उपस्थितीत मा.गीता उत्तरवार जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी यांच्या मार्फतीने सदर निवेदन पाठविण्यात आले.
यामध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे, विद्यार्थ्यांना दर्जेदार व जबाबदारीने शिक्षण देण्यासाठी शासकीय सेवेतीलच शिक्षक आवश्यक आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करावे. समूह शाळा या गोंडस नावाखाली आपल्या राज्यातील २० पटाखालील शाळांची माहिती मागविण्यात येत आहे. खरं तर २० पटाखालील शाळा या डोंगराळ भागात वाडीवस्तीवर असून वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांना नागरी भागातील विद्यार्थ्यां इतकाच शिकण्याचा अधिकार असल्याने वस्तीशाळा उभ्या झाल्या करिता समूह शाळा संकल्पना रद्द करावी. शाळा दत्तक योजना रद्द करणे व सीएसआर चा योग्य वापर करणेसाठी शाळा दत्तक देणेऐवजी कंपनीचा सीएसआर एकत्रित करून त्यातु गरजू उपक्रमशील शाळांचा विकास करावा. जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक या दोन कामाव्यतिरिक्त इतर कोणतीच कामे शिक्षकांना लावू नयेत असे शासन निर्णय व मे.न्यायालयीन आदेश असताना या दोन कामाव्यतिरिक्त शिक्षकांना असंख्य कामे लावली जातात. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांकडील इतर सर्व अशैक्षणिक कामे रद्द करून शिक्षकांना शिवण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. गेली ४ वर्षे शिक्षक भरती न झाल्याने आपल्या राज्यात शिक्षकांची सुमारे ४० हजार पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. करिता राज्यातील शिक्षकांची सर्व रिक्त पदे १००% लवकरात लवकर भरावीत.
वरील सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून राज्यातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेला संघटनात्मक आंदोलन करावे लागेल किंवा मा. न्यायालयात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर राज्यध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांचेह पुरोगामी शिक्षक संघटना पदाधिकारी सुरेश गिलोरकर जिल्हा सरचिटणीस, शालिनी देशपांडे जिल्हा महिला मंच अध्यक्ष, पौर्णिमा मेहरकुरे जिल्हा सचिव, लता मडावी जिल्हा कोषाध्यक्ष, पुनम सोरते जिल्हा संघटक, उपाध्यक्ष सुभाष अडवे, विलास मोरे, लोमेश येलमुले, नरेश बोरीकर, प्रकाश झाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विजूक्ता चे पदाधिकारी पदाधिकारी प्रभाकर पारखी प्रसिद्धी प्रमुख, दिलीप मोरे, प्रा.रवी झाडे, डॉ.विजय हेलवटे, विलास गौरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Discussion about this post