बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा
● विदर्भ युनिटच्या 100 पेक्षा अधिक अधिकारी सहभागी, विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेच्या महिला सदस्यांचा रामटेक येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भ युनिटच्या 100 पेक्षा अधिक महिला अधिकारी उपस्थित होत्या. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, या जिल्ह्यातील महिला अधिकारी या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
शनिवारी दिनांक 8 मार्च रोजी रामटेक येथील कॅम्प चेरी फार्म येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्यात महिला बँक कर्मचा-यांचे मानसिक स्वास्थ या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच फिट इंडिया या उपक्रमांतर्गत महिलांसाठी साहसिक उपक्रम घेण्यात आले. बँकेत महिला कर्मचा-यांची उपस्थिती वाढत आहे. त्यामुळे घर आणि कार्यालय सांभाळून बँकेला अधिकाधिक योगदान कसे देता येईल याबाबत चर्चासत्र झाले. यावेळी विविध कर्मचा-यांनी आपले मतं मांडले.

सरकारने बँकेसाठी 5 दिवस आठवडा करूनही त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याचा पाठपुरावा कऱण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी अधिका-यांनी केलेले नृत्य, गायन, स्टँडअप यांनी उपस्थितांचे मनं जिंकली. अधिकारी संघटनेचे महासचिव महेंद्र ढोंडसे, अध्यक्ष आशिष टेकाले, उपमहासचिव नीलेश वाहणे, महिला प्रतिनिधी स्नेहल वानखेडे व जान्हवी त्रिकांडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
Discussion about this post