नमस्कार मित्र मंडळी, चला तर मग जाऊया एका नवीन प्रवासाविषयी! यामध्ये आपण काही नवीन गोष्टी आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल जाणून घेऊया.
सकाळी उठल्यावर आम्ही प्रवासाची तयारी केली. सात वाजता निघायचं होतं, कारण तिकडे रेल्वे स्टेशन पोहोचायला अर्धा तास लागतो. त्यासाठी आम्ही घरून लवकर निघालो. जाताना खूप ट्रॅफिक जाम लागला, तरीही आम्ही रेल्वे स्टेशन पोहोचलो. स्टेशनवर माहिती मिळाली की ट्रेन लेट आहे. मग काय, वाट बघता बघताच वेळ निघून गेला. शेवटी ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो.
ट्रेन रेल्वे स्टेशनबाहेर निघाली तेव्हा आम्ही वातावरणाचा आस्वाद घेत समोरच्या दृश्याकडे पाहत होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही तिरुपती, (Tirupati Temple) आंध्र प्रदेशला पोहोचलो. तिथून तिरुपती शहरात जाण्यासाठी आम्ही बस पकडली. त्या बस मध्ये खूप जास्तच गर्दी होती आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. याकडे लक्ष न देता आम्ही तिरुपती शहर कडे जाणाऱ्या अनंत पर्वताचा आशावाद घेत शहरात पोहोचलो. आणि त्यानंतर तिथून समोर तिरुपती मंदिराकडे गेलो. बघितले तर काय; मंदिरात खूप गर्दी होती. दर्शनासाठी आम्हाला २ तास लागले. दर्शन केल्या नंतर आम्ही संपूर्ण मंदिर फिरलो आणि त्याचा धार्मिक चाली रीती माहिती झाली. त्याबरोबर आम्ही संपूर्ण शहराचे दर्शन घेतले. त्यात आम्हाला एक बाब सारखी वाटली ती म्हणजे तेथील रस्ते आणि त्यांची आखणी ही सारखी होती. त्यानंतर आम्ही तिथे जेवणाचा स्वाद घेत पुढे वाटचाल केली.
तिरुपती शहरांमध्ये सर्वात मोठे तिरुपतीचे मंदिर आहे. त्या मंदिरामुळे या शहराला एक वेगळी ओळख मिळते आणि त्या ओळखीमुळे हे शहर खूप प्रसिद्ध झाले आहे. हे या शहरातील अत्यंत श्रीमंतांच्या मोजणी आखडले जाते. या शहराकडे जाताना जाण्याच्या प्रवासाच्या दरम्यान आम्ही अनेक दृश्ये बघितली ज्यापैकी तिरुपती, उदार आकाश, दर्शनाचे पहाड आणि लोकांचा धार्मिक उत्साह काही सर्वांना प्रभावशाली आणि आनंदकारक वाटत होते. या प्रवासात आम्ही अनेक सुंदर गोष्टी बघितल्या. त्यानंतर तिरुपतीचे एक मातंग स्वर्गीय ठिकाण होते, ते तिथलं अनंत गिरी पर्वत भक्तांचा आवाज आणि सुखद वातावरण होतं, लोकसंख्या अत्यंत अधिक आहे त्या संस्कृती धार्मिक समृद्धी प्रत्यक्ष दर्शन घ्यायला मिळाले.
त्यानंतर आम्ही तेथून पुढे हैदराबादला गेले. हैदराबादमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथे आम्ही निजामहेल आणि चारमिनार यासारख्या ऐतिहासिक ठिकाणाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही नंतर पुढे वापस नागपूरला यायला निघाले, तेव्हा आम्हाला येताना अजून खूप मोठ्या मोठ्या मुर्त्या देवस्थाने गेलो, त्या दिवस देवस्थानाचे दर्शन घेतले आणि आमचा प्रवास इथेच आम्ही पूर्ण केला.
– धनश्री घाटे
Discussion about this post