आयुष्य जगण्याची खरी मजा म्हणजे प्रवास. प्रवास जवळचा असो किंवा लांबचा. प्रत्येक प्रवास केला की मनाला वेगळाच आनंद येतो. असा माझा एक आनंदाला घेरून घेणारा प्रवास माझ्या शेतातला.
ते म्हणतात ना “अन प्लॅन थिंग्स बिकम मोस्ट ब्युटीफुल मेमरी” तर या प्रवासाला सुरुवात झाली जेव्हा मला नुकताच विचार माझा वाढदिवसाचा आला होता, वाढदिवस म्हटलं तर सगळ्यांसाठी खास असतो आणि तो दिवस फक्त आपला असतो नेहमीप्रमाणे मला माझा वाढदिवस घरी मित्रांसोबत किंवा मैत्रिणी सोबत साजरा न करता फक्त माझ्या घरच्यांसोबत साजरा करायचा होता. पण मग विचाराला की नेमका कुठे करायचा मग म्हटलं खरोखर जर हा दिवस अविस्मरणीय बनवायचा असेल तर गावातल्या शेता पेक्षा चांगली जागा कुठेच नाही. मनाला भावेल तशी वाहणारी शुद्ध हवा चारही बाजूला दरवळत असलेली मातीची सुगंध स्वच्छ आकाशात उडणारे पक्षी आणि त्यांचे गोड आवाज बाबांनी ठरविल्याप्रमाणे आम्ही माझ्या वाढदिवस साजरा करण्यात करिता आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी घरून सहा वाजता निघालो. लाडकी हा गाव हिंगणघाट तालुक्यात आणि वर्धा जिलहयात येते ……गाणी आणि खूप साऱ्या गप्पा करत कधी गाव जवळ आला कळलच नाही शहरी गुंगाटा पासून खूप दूर निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाला राहावेसे वाटते आम्ही सगळे पोहोचलो आणि आपल्या आपल्या कामाला लागलो कुणी काड्या जमा करायला लागले कोणी पाणी आणि आम्ही बच्चा पार्टी मस्त नदीकडे जाऊन धमाल केली.
वेगवेगळे खेळ खेळले आणि मग मस्त पोट पूजा करायसाठी परतलो बघतो तर काय गावठी चिकन पांगे आलू वांग्याची भाजी कढी भजी भात हरभरा मस्तपैकी झाडाखाली जीवनासाठी बसलो आणि खूप सारी हासी मजा करत पोटभर जेवण केलं आणि नुकताच माझ्या वाढदिवसाचा केक आणला होता.
सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या ज्या दिशेने आयुष्याची पाऊलवाट नेहमी आनंदाची अनुभूती करून देते असा हा दिवस ठरला होता…… दिवस हा संपू लागला सगळं आवरून आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो दिवस मावळला. पण आयुष्य नाही उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळी जशी मनाची भावना मनालाच करते तशीच या सुंदर दिवसाची ओढ माझ्या मनाला कायम राहणार.
– सताक्षी खाडे
Discussion about this post