सरपंच ते पंचायत समिती सभापती : विजय कोरेवार
सावली तालुक्यातील खेडी गावातील विजय कोरेवार हे एक सामान्य व्यक्तिमत्व. धनगर समाजात जन्मलेले कोरेवार यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि मेहनतीने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सावलीच्या रमाबाई आंबेडकर विद्यालय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर कोरेवार यांनी सुरुवातीला श्रमिक एल्गार या संघटनेमध्ये काम केले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांचा संघर्ष पाहून लोकांनी त्यांना गावच्या सरपंचपदी निवडून दिले. श्रमिक एल्गारच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्या सभा घेतल्या. यामुळे गावात संघटन झाले. तरूणांना ताकद मिळाली. त्यानंतर झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत ते विजयी झाले आणि घराच्या दारवर, ‘विजय कोरेवार, सरपंच, ग्राम पंचायत खेडी’ अशी पाटी लागली. सरपंचपदावर असताना त्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी गावातील रस्ते, शाळा, आणि आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा केली. तसेच, त्यांनी गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
चंद्रपूर दारूबंदी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. दारूबंदी करीता श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते पुढाकार घेऊन पकडुन देत होते. तेव्हा हप्ते बंद झाल्याने तेव्हा चे मूल पोलीस स्टेशनचे एपीआय कुनघाडकर यांनी विजय कोरेवार मारहाण केली होती. चंद्रपूर जिल्हयातील राजूरा उपविभागातील जमिनीचा मोठा लढा श्रमिक एल्गारने उभारला. या लढ्यात पारोमिता गोस्वामी आणि विजय सिद्धावार यांच्या सोबत राहून काम केले. श्रमिक एल्गार च्या प्रत्येक लढ्यात ते सहभागी झाले. ते पुढे श्रमिक एल्गारचे महासचिव बनले. विविध मोर्चे, आंदोलन काढली. कोरेवार यांच्या कामगिरीमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. यातूनच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ब्रह्मपुरी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात त्यांनी पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. मागील अडीच वर्षे सावली पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले.
सभापती विजय कोरेवार यांच्या धडक कारवाईमुळे सावली तालुक्यात खळबळ माजली होती. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात दारू पिऊन येणाऱ्या शिक्षकावर कारवाई केली. याच काळात कोरोना ने थैमान घातले होते. त्यावेळी तालुक्यातील अनेक मजुरांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन या आजाराबद्दल जागृती केली. तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनातून विविध योजना राबविल्या.
कोरेवार यांच्या यशाची कहाणी ही धनगर समाजातील सामान्य व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि मेहनतीने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोरेवार यांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांची निष्ठा आणि समर्पण. ते नेहमीच आपल्या समाजाच्या आणि गावाच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांची कठोर परिश्रम आणि मेहनत त्यांना यशापर्यंत पोहोचवली आहे.
सावली तालुक्यातील सर्व गावांचा विकास करणे, गावातील लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनकडून राज्यात उत्कृष्ट सभापती म्हणून पुरस्कार मिळाला. सध्या काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहेत. कोरेवार यांच्या यशामुळे धनगर समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे यश हे धनगर समाजातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
आज 25 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस. यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
– देवनाथ गंडाटे
Discussion about this post