माझा राजस्थान प्रवास इतर प्रवासापेक्षा वेगळा होता. हा प्रवास अंधारातून सुरू होऊन अंधारातच संपला. वादनाला जायचे ठरल्यावर आमचा आनंद वेगळाच होता. वादनाला जायला मिळणे दुर्मिळ असते. तयारीला सुरुवात झाली. आईने जेवणाचे टिफिन आणि खायला काही वस्तू दिल्या. रात्री दहा वाजता आम्ही मैदानात जमा झालो. काही वेळाने घरच्यांची रजा घेऊन आम्ही राजस्थानची वाट धरली.
माझा प्रवास काही वेगळाच अंधारात फिरण्याचा राजस्थान जायचे आहे. माहित झाल्यावर आमचा आनंद वेगळाच काय न्यायचे आणि काय नाही न्यायचे याची तयारी चालू झाली. वादनाला जायचे हे माहित झाल्यावर नेहमी आमचा आनंद वेगळाच असतो . आम्हाला फिरायला भेटत नाही.तरीही वादणात एक वेगळाच आनंद असतो . सगळ्यांच्या आईने जेवणाचे टिफिन आणि खायला काही वस्तू दिल्या. मला रात्रीच्या सुमारास दहा ला आम्ही मैदानात सगळे जमा झालो. काही कालावधी नंतर आम्ही सगळे मैदानात पोहोचलो घरच्यांची रजा मंदी घेऊन आम्ही सगळ्यांनी राजस्थान ची वाट धरली. राजस्थान जातान आम्ही खूप मस्ती केली .गाणे म्हटले शायऱ्या म्हटलं तसेच एक दुसऱ्याची नक्कल करत हा प्रवास गाठला.रात्रीची वेळ असल्यामुळे आम्हाला बाहेरच काही पाहता आलं नाही बाहेर पाहूनही फक्त अंधारच दिसायचा मग काय मस्ती करत गाणे म्हणत निघालो आम्ही प्रवासाला, खूप भूक लागल्यामुळे आम्ही आमच्या बस काकांना एका धाब्यावर बस थांबवण्यास आग्रह केला. तेथे जेवण करून आम्ही काही वेळानंतर पुढचा प्रवास गाठला. जेवण केल्यानंतर सगळे झोपी गेले झोपेत कधी आम्ही राजस्थान पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही. राजस्थानमध्ये पोहोचू बघतो तर काय त्यांची परंपरा काही वेगळीच दिसली त्यांची राहण्याची पद्धत त्यांच्या घराची वेगळीच कला निराळी होती.
छोट्या छोट्या गल्ल्या ते रस्ते आमच्यासाठी वेगळेच होते. राजस्थान फोटोमध्ये पाहण्यापेक्षा अस्तित्वात जाऊन पाहणे यात काही वेगळेच अंतर होते राजस्थान पोचल्यावर आम्हाला त्यांनी एका कार्यशाळा आयोजित करून दिली तिथे आमच्या नाश्त्याची व चहाची व्यवस्था करून ठेवलेली होती तयार होऊन आम्ही नास्ता व चहा घेऊन आम्ही आमचे वादनाचे सामान काढायला सुरुवात केली. मग काय वादनाचे सामान काढून ते व्यवस्थित ठेवून आम्ही तयार झालो. वेळ कमी असल्यामुळे पटापट आवरून आम्ही तयारीला निघालो आम्ही तयार होऊन आलो तेव्हा आमची बस तयारच होती. मग काय वादनाच्या ठिकाणी पोचायला अर्धा तास लागणार होता.म्हणून वेळ वाया न घालवता आम्ही निघालो वादनाच्या ठिकाणावर तेथील ते दृश्य खूप सुंदर होते. मोठमोठे गणपतीची मूर्ती आम्हाला पाहण्यास मिळाली. त्यांनी केलेली ती पूजा त्यांची वेगळीच परंपरा जोपासण्यास मिळाली.
आमची तयारी पाहून त्यांना महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा शृंगार कसा असतो ते कळले. गणपती विसर्जनाचे ते वादन आमच्यासाठी आत्मस्मरणीय होते मग काय ढोल ताशा म्हणजे आनंद आणि उत्साह त्याच उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम पार पडला रात्री बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला वादनाचा कार्यक्रम संपल्यावर आपले वाद्य बांधून बस मध्ये कार्यालयाकडे निघालो. कार्यालयात जाऊन जेवण केले आपले सामान बांधून आम्ही पुन्हा निघालो. आपल्या रात्रीच्या प्रवासाला तो कोणता तर ते म्हणजे नागपूर गाठायला सामान बस मध्ये चढवून थकलेल्या अंगाने आम्ही बसमध्ये चढलो. खूप थकलं खूप थकलो असल्यामुळे कोणातही मस्ती करण्याची क्षमता नव्हती म्हणून शांतता झोपून आम्ही नागपूरला निघालो रस्त्यात कुठेतरी पहाटे थांबले थांबून थोडा थोडा नाश्ता व चहाचा आनंद घेतला मग पुन्हा नागपूरचा प्रवास गाठला रात्री नऊ चा आसपास आम्ही नागपूर पोहोचलो. घरच्यांना फोन करून मैदानात बोलाविले. मला घ्यायला बाबा आलेले होते. आम्ही सगळे एकमेकांना बाय करून आपापल्या घरचा रस्ता गाठला .राजस्थानमध्ये गेल्यावर तिथल्या लोकांनी दिलेलं प्रेम केलेले कौतुक आम्ही सदैव आमच्या लक्षात ठेवू . आम्हाला तिथे गेल्यानंतर खूप आनंद झाला. सगळ्यांची वेगवेगळी कला परंपरा पाहण्यास मिळाली.
असा हा आमचा राजस्थानचा प्रवास आमच्यासाठी नेहमीप्रमाणे आत्मस्मरणीय ठरला. माझा हा प्रवास नेहमीप्रमाणेच हा देखील प्रवास अंधारात सुरू होऊन अंधारातच संपला.
Discussion about this post