अशी केली जीवाची मुंबई
तर मी घरासोबत निघाले जीवाची मुंबई करायला. या प्रवासाची सुरुवात झाली वर्धा रेल्वे स्टेशनवरून. सातच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. साडेसातची वर्धा-सेवाग्राम एक्सप्रेस नेहमीप्रमाणे गाडी लेट होती. रेल्वे स्टेशनवर बसून बाजूच्या लोकांचे किस्से ऐकून असं वाटलं की किती काही सुरू असताना एखाद्याच्या आयुष्यात काय काय घडत असतं. कोणाचं प्रमोशन होतं, कुणाचं लग्न जमत, कुणाला नोकरी लागते तर एकीकडे कुणी आपली नोकरी, आपले माणसं सगळच गमावून बसतात. आपण स्वतःच्या आयुष्यात इतके मग्न होतो की इतरांच्या आयुष्यात काय घडतंय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर हे सगळे विचार डोक्यात सुरू असताना गाडीची अनाउन्समेंट झाली. नऊच्या सुमारास आम्ही गाडीत बसलो आणि आता विषय निघाला तू काशीचा. आपल्या घरी नातेवाईकांमध्ये किंवा मित्र मंडळांमध्ये असं एक व्यक्ती नेहमी असतं आणि तो नेहमी त्या चर्चेचा विषय बनतो. तर या सगळ्या चर्चेत रात्र झाली, आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. डोंबिवलीच्या वडापावला तेव्हा वाटलं की नाही… आपण मुंबई फिरायला आलोय. आता गाडी थांबली की थेट छत्रपती शिवाजी टर्मिनल. ठाणेला आणि तिथली गर्दी बापरे… लोकांपर्यंत येतात त्यांची लोकलमध्ये चढतानाची धडपड पाहून मलाच कुठेतरी भीती वाटायची. आणि लोकल जाताच सगळी गर्दी गायब. मुंबईचे ते धकाधकीचा वातावरण पाहून वाटलं की आपण खूप सुखी आहोत की आपले आयुष्य शांतपणे पण सगळं कसं व्यवस्थित चाललंय. आता तिथून गेलो आम्ही माझ्या आत्याच्या घरी घोडबंदर रोडवर. एक दिवस प्रवासाचा थकवा काढला आणि दुसऱ्या दिवशी एक गाडी बुक केली आणि आम्ही निघालो मुंबई दर्शनाला.
सुरुवातीला आम्ही गेलो राणीच्या बागेत. तिथे फक्त राणी नाही तर जंगली प्राणी, वाघ, चित्ता, भालू, हत्ती आणि सगळे पक्षी सुद्धा होते. वाघाला मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिलं आणि वाघ म्हटलं की एक वेगळच आकर्षण असतं. लोकांची इतकी गर्दी जमली की खूप मी पण त्या गर्दीत फोटो काढायला होते सगळ्या प्राण्यांचे आणि माझे सुद्धा फोटो काढले. त्यानंतर आम्ही निघालो गेटवे ऑफ इंडियाकडे. तिथे ताज हॉटेलचा सौंदर्य कुठेतरी मुंबईकरांचे स्टॅंडर्ड दाखवत होत. ताज हॉटेल समोर आणि गेटवे ऑफ इंडिया समोर खूप फोटो काढले. त्यानंतर आम्ही गेलो ते समुद्रात बोटिंग करायला. तो अथांग समुद्र, त्याच्या खळखळणाऱ्या लाटा, सगळं कसं अविस्मरणीय होतं. त्यानंतर आम्ही निघालो बांद्राच्या बीचवर जायला.
तिथे शाहरुख खानचा बंगला मन्नत बघितला. ते पण जुने स्वप्नच होतं त्याला बघायला थांबलेले माझ्यासारखे पुष्कळजण होते पण त्याचे दर्शन काही झाले नाही. पण त्यानंतर आता मी दर्शनाला गेलो ते सिद्धिविनायकाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. जरा वेळ तिथे बसलो आणि तिथून गेलो ते जिओच्या बीचवर. तिथे आम्ही पाण्यात गेलो, खेळलो पण जरा वेळ गेल्याने समुद्र खळखळून आला. तिथे पोलिसांनी जायला अटकाव केला. ते म्हणतात ना खवळलेल्या समुद्राला कधी आलिंगन नाही घालावे तर तेव्हा तिथे असंच काहिस झालं. म्हणून तिथे आम्ही जास्त वेळ न घालवता आम्ही गेलो मरीन ड्राइव्हवर. शेवटी तिथे पण समुद्राची पण शांतता. मरीन ड्राईव्ह ही मुंबईकरांसाठी एक अशी जागा आहे की त्या धकाधकीच्या आयुष्यातून ते मावळणाऱ्या सूर्याकडे पाहून शांतता लागतात आणि आपला स्ट्रेस घालवतात. आम्ही तिथे गेलो दिवसभराचे दगड काढायला. फोटो काढले. आता फोटो म्हटलं की बऱ्याच जणांचा वेगळे मत असतं. ते म्हणतात की कशाला हवे फोटो, आपण येथे आलो इथ लक्षण जगात. त्यांचं म्हणणं बरोबर असतं पण याला एक वेगळी बाजू आहे की फोटो हे हे कसे माध्यम आहे की त्यात आपण आपल्या आठवणी साठवून ठेवू शकतो. काही वर्षानंतर जेव्हा आपण ते बघून तेव्हा आपल्याला आपण तो जगलेला क्षण आठवल आणि काही वर्षानंतर फोटोचा महत्त्व कळतं जेव्हा आपण हे आपल्या जीवनात इतके गुंतून जातो की एक सुट्टीचा दिवसही बाहेर जायला आपल्याला वेळ नसतो. तर फोटोचे मत मांडणारे म्हणजे माझ्या घरचे. त्यांचे सारखं म्हणणं असतं की काय तू नुसते फोटो काढत असतेस पण त्यांना कोण सांगणार ना त्या मागचा असा विचार आहे. म्हणून असो तर आता मरीन लेयरची शांतता जगलो तर आता घरी जायचं म्हणजे मुंबईच्या ते ट्राफिक सहन करणार. दोन तासांचा ट्रॅफिकचा करून आम्ही घरी पोहोचलो आणि हा मुंबई दर्शनाचा प्रवास इथे सुख संपूर्ण झाला.
– आश्लेषा भट
Discussion about this post