khabarbat news live update local News
गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर,अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास्तव्यास आहे. आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे.
KhabarBat™ | Latest News | Breaking News in India
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता.
आदिवासी भाषेतील ‘कसा’ या शब्दाचा नेमका अर्थ काय?
‘कसा’ हा प्रत्यय प्राचीन संस्कृतमध्येही वापरला जात असे. उदाहरणार्थ, “पुष्पकसा” या शब्दाचा अर्थ “पुष्पक असलेले स्थान” असा होतो. त्याअर्थी कसा म्हणजेच ठिकाण. पूर्व विदर्भातल्या अनेक गावांच्या नावांमध्ये ‘कसा’ हा प्रत्यय आढळणे हे या प्रदेशाच्या प्राचीन संस्कृतीचे आणि इतिहासाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. जसे गोंदियातील सालेकसा, दारेकसा, गडचिरोलीतील हेमलकसा. (Hemalakasa- Salekasa )
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात विशेषतः गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात ‘कसा’ हा प्रत्यय लागून काही गावांची नावे आढळतात, हे खरे आहे. त्यातही गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण जास्त असून या जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावांची नावे ‘कसा’ हे प्रत्यय लागून बनलेली आहेत.
गडचिरोली जिल्हा हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. साहजिकच ‘कसा’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागांत उत्कृष्ट समाजसेवा करणारे आदिवासी बांधव श्री. गणेश कोवे यांच्या माहितीनुसार ‘कसा’ या शब्दाचा आदिवासी भाषेतील (माडीया/गोंडी) अर्थ ‘पाणथळ जागा’ किंवा ‘तलाव’ किंवा ‘छोटे सरोवर’ असा होतो. कसा या शब्दाचा एक जुना मराठीत अर्थ पाणी होतो. हेमलकसा व सालेकसा या दोन्ही गावा नजीकच्या क्षेत्रात भरपूर पाणी आहे , उदा. नदी ,नाले, धबधबे, झरे
‘हेमलकसा’चा अर्थ ‘हेमल’ म्हणजे आदिवासी भाषेत ‘कासव.’ कासव असलेले सरोवर म्हणजे ‘हेमलकसा’ (Hemalkasa) होय. हेमलकसा हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील एक गाव आहे. इथे लोकबिरादरी प्रकल्प आहे. एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणून ओळख आहे.
‘दारेकसा’/’दरेकसा’चा अर्थ= ‘दर्रो’ हे आदिवासींमधील एक आडनाव आहे. दर्रो कुटुंबाच्या मालकीचे सरोवर म्हणजे दर्रोकसा. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘दर्रेकसा’ (Darrekasa) झाले. मूळ शब्द ‘दारेकसा’ नसून ‘दर्रेकसा’ आहे.
हेटलकसा = ‘हेटळ’ म्हणजे आदिवासी भाषेत विळा किंवा कोयता. म्हणजे कोयत्याच्या आकाराचे सरोवर होय.
बोदलकसा = ‘बोदल’ हा एक माश्याचा प्रकार आहे. जेथे हे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात ते सरोवर म्हणजे बोदलकसा.
अशाप्रकारे या भागात ‘कसा’ प्रत्यय लागून आदिवासी गावांची नावे बनलेली आहेत.
पूर्व विदर्भातल्या अनेक गावांच्या नावांमध्ये ‘कसा’ हा प्रत्यय आढळतो. या प्रत्ययाचा अर्थ “स्थान” असा होतो. उदाहरणार्थ, “दारेकसा” या गावाचे नाव “दारे” या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ “दार” असा होतो.
नावाच्या शेवटी ‘कसा’ प्रत्यय असलेल्या गावांची नावे सांगा?
काही उदाहरणे आहेत:
गोंदिया जिल्हा:
सालेकसा
दारेकसा
काटेकसा
भेंडरकसा
मांडूकसा
कोंडाळकसा
गडचिरोली जिल्हा:
हेमलकसा
Pekinkasa
डोंगरकसा
मुंडरकसा
नारळकसा
बोरगावकसा
चंद्रपूर जिल्हा:
सोरेकसा (जिवती )
Maharashtrachi Khabarbat | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Maharashtra | Marathi News
marathi | Marathi news | Marathi news Live | Tv9 marathi Headlines | Ganesh Chaturthi | Ganeshotsav 2023 | Shivsena 16 MLA Disqualification Hearing | Parliament Special Session | PM Modi | India Alliance | INDIA Meeting | Maratha Protest | Jalna | Jalna Maratha Protest | Maratha andolan | maratha reservation | jalna police | Jalna Lathi Charge | Sharad pawar on jalna maratha protest | Marath Rahul Gandhi Live | INDIA Alliance LIVE | Rahul Gandhi | Chandrayaan-3 | PM Modi | Chhagan Bhujbal | Marathi Top News | Marathi news lava | Maharashtra Politics | Thackeray Vs Shinde | Nawab Malik | ajit pawar – sharad pawar | Raj Thackeray | Maharashtra Vidhan Sabha | Sharad Pawar | Sharad Pawar | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Priyanka Chaturvedi | Maharashtra Weather Forecast | Uddhav Thackeray LIVE | Sharad Pawar Live | Ajit Pawar LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadnavis LIVE Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra
Discussion about this post