शांतीचा अनुभव देणारं ड्रॅगन पॅलेस टेम्पल
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध धर्माचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तथागत बुद्धांना समर्पित हे विहार शिल्पकलेचे अद्भुत प्रतीक आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलची निर्मिती १९९९ मध्ये झाली. हे बुद्धकालीन इतिहासात एक महत्त्वाचे आणि पवित्र नाव आहे. बुद्धधर्मातील पवित्र लोटस सूत्राच्या बाराव्या अध्यायातील बोधीसत्व मंजुश्रीचा इतिहास ड्रॅगन पॅलेसशी संबंधित आहे. हा प्रवास एका दिवसासाठी आयोजित करण्यात आला होता. प्रवास कारद्वारे पार पाडण्यात आला.
प्रवासादरम्यान मेट्रो स्टेशन, शेती, नागलोक बुद्धाची ६५ फुटांची भव्य मूर्ती, लॉन, मारोती कार शोरूम आणि मेट्रो गाडीचा आवाज अशा अनेक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळाल्या.
प्रवासादरम्यान दिसलेले निसर्गदृश्य, छायाचित्रण आणि ड्रॅगन पॅलेस मधील शांततापूर्ण वातावरण हे प्रवासातील काही अविस्मरणीय अनुभव होते.
या प्रवासातून मला बुद्धांची भव्य मूर्ती आणि त्यांच्या जीवनाबद्दल भरपूर माहिती मिळाली. बुद्धांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश मला प्रेरणादायी वाटला.
ड्रॅगन पॅलेस मधील निसर्गरम्य दृश्य, सायंकाळच्या वेळी रंगीबेरंगी दिवे आणि शांततापूर्ण वातावरण हे मला खूप आवडले.
ड्रॅगन पॅलेस ला भेट देणे हा एक अविस्मरणीय आणि शांततापूर्ण अनुभव होता. मला या प्रवासाचा खूप आनंद झाला आणि मला पुन्हा येथे येण्याची इच्छा आहे.
लेखक: साची गाणार
Discussion about this post