पाणी हे जीवन आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मात्र, पाण्याचा दूषित होणे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकते. पाण्यातून विविध आजार होतात, जे आपल्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करू शकतात. या आजारांमध्ये त्वचा रोग, केसांचे आजार, टक्कल पडणे, खाज आणि इतर गंभीर समस्यांचा समावेश होतो.
पाण्यातील अशुद्धता आणि विषाणू आपल्या शरीरावर विविध दुष्परिणाम करत आहेत. पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि प्रदूषक आपल्या त्वचेला आणि केसांना हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ, दूषित पाण्यामुळे त्वचेवर चट्टे, चट्टे पडणे आणि इन्फेक्शन होणे सामान्य बाब आहे. तसेच, अशुद्ध पाण्यामुळे टक्कल पडणे, केस गळणे आणि डोक्याच्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची समस्या देखील वाढू शकते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ आणि नांदुरा तालुक्यातील १ अशा गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून टक्कल व्हायरसचा अर्थात केस गळतीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आता या व्हायरसचा एक रुग्ण मोताळा तालुक्यात नव्याने आढळल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एका रुग्णाने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात येत त्वचा रोग तज्ञाकडे केस गळती होत असल्याचं सांगितलं.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमध्ये गेल्या 25 दिवसापासून केस गळती होणे व त्यानंतर टक्कल पडणे अशा आजाराने (Buldhana Hair Loss) नागरिक त्रस्त आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. सद्यस्थितीत 210 ते 220 रुग्ण बाधित असून प्रशासन मात्र वेळ काढू धोरण अवलंबत आहे. केंद्र सरकारची आयसीएमआरची टीम या परिसरात येऊन गेले, चार दिवस अभ्यास करून वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती होण्याचा प्राथमिक अंदाज ही त्यांनी वर्तवला,
बुलढाण्यातील शेगाव इथला केस गळतीचा परिणाम आता फक्त केस गळती पुरता मर्यादित राहिला नाही तर थेट सोयरिकीपर्यंत येऊन पोहोचलाय. केस गळतीमुळे शेगावातील बोंड गावात मुलांची लग्न जुळेना झालीत. टक्कल पडतंय म्हणून कोणी पोरंगी देईना झालंय. टक्कल व्हायरसच्या भितीने गावातील सोयरिकी थांबल्यात. अहो इतकंच काय? किराणा दुकानात किराणा मिळेना, ना दुधवाला दुध देईना तर भाजीवाला भाजी देईना झालाय. बुलढाण्यातील शेगाव इथल्या केस गळतीच्या रूग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि आयुष मंत्रालयाच्या पथकासह आयसीएमआरची टीमही ठाण मांडून बसलीये मात्र ही केस गळती नेमकी कोणत्या कारणाने होतेय? याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, आरोग्य यंत्रणांकडून काही व्यक्तीच्या केसांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण काय? हे समोर येण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे टक्कल पडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चाललीये. तर कोल्हापुरातील एका सलमान नावाच्या व्यक्तीने ज्यांच्या डोक्यावरचे केस गेले त्याचे केस माझ्या औषधाने येऊ शकतात असा दावा केलाय.
मात्र याबाबत अद्यापही जिल्हा आरोग्य विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने नेमकं हे प्रकरण काय आहे असा प्रश्न पडला आहे. आता हा व्हायरस शेगाव, नांदुरामार्गे मोताळा बुलढाणा शहरात पोहोचतो का याची भीती नागरिकांना सतावत आहे. कारण मोताळापासून हाकेच्या अंतरावर जिल्ह्याचं मुख्यालय हे बुलढाणा शहर आहे. त्यामुळे आता प्रशासन कशी पावलं उचलतं हे पाहावं लागेल.
मोदी सरकारमधील केंद्र मंत्रिमंडळातील सदस्य व जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असल्याने त्यांनी तातडीने याची दखल घेऊन आरोग्य यंत्रणांना कामी लावलं. बाधित गावांना वायसीएमआर दिल्ली, चेन्नई, भोपाळ येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी भेटी दिल्या. अलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी आणि आयुर्वेद या चार प्रमुख वैद्यक शाखांचे तज्ज्ञही येऊन गेले. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पथकं आली. एवढ्या मोठ्या संस्थांचे तज्ज्ञ येऊन गेले, मात्र आजार नेमका कशामुळे आणि त्यावर उपाय काय, हे कुणालाच सांगता आलं नाही.
शेगाव तालुक्यातील ११ आणि नांदुरा तालुक्यातील एक अशा एकूण १२ गावात केस गळतीचे रुग्ण आढळून आले. नांदुरा तालुक्यातील वाडी या १९४२ लोकसंख्या असलेल्या गावाचा यात समावेश आहे. येथील तीन कुटुंबातील सात रुग्ण हे ३ ते ४५ या वयोगटातील आहेत. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा, घुई, तरोडा खुर्द, पहुरजिरा, माटरगाव आणि निंबी ही गावं बाधित आहेत. या गावातील पाणी तसंच बाधितांच्या रक्ताचे नमुने, नखं, केस यांचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.
शा परिस्थितीत, सरकारने पाण्याच्या शुद्धतेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य पाणी व्यवस्थापन पद्धती लागू करणे गरजेचे आहे. सरकारी स्तरावर स्वच्छ पाणी पुरवठा, जलाशयांची स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणांची स्थापना ही महत्वाची पावले ठरू शकतात.
तसेच, सरकारने लोकांना जलस्वच्छतेबद्दल जागरूक करणे आणि सखोल माहिती देणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेज आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पाणी आणि आरोग्याविषयक माहिती देणारी शिबिरे आयोजित केली जाऊ शकतात. यामुळे लोक पाणी शुद्धतेसाठी प्रयत्नशील होतील आणि त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होतील.

अखेर, पाण्याच्या शुद्धतेसाठी सरकारला कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील प्रत्येकाने योगदान दिल्यासच आपल्याला पाणीजन्य आजारांपासून मुक्तता मिळू शकते. पाणी शुद्ध करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे सरकारने योग्य उपाययोजना केल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल.
Discussion about this post