जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक विवेक शेंडे यांचे निधन.
सायंकाळी सहा वाजता पवनीधाबे येथे अंतिम संस्कार.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१५.
येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रशिक्षीत स्नातक शिक्षक (समाजोपयोगी उत्पादक कार्य)
विवेक निळकंठराव शेंडे यांचे आज दि.१५ ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी नागपूर येथे त्यांच्या राहत्या घरी आकस्मिक निधन झाले.ते ५९ वर्षाचे होते.ते नजीकच्या पवनी धाबे येथील रहिवासी होते.
त्यांच्यामागे पत्नी अनिता,अभिषेक आणि चुडचंद्र हे दोन मुले,वडील,दोन भाऊ,एक बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
निधनाचे वृत्त कळताच जवाहर नवोदय विद्यालयात शोककळा पसरली आहे.त्यांना विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे जन्मगाव पवनी धाबे येथेही शोककळा पसरली आहे.
आज(दि.१५.)सायंकाळी ६.०० वाजता पवनीधाबे येथील स्थानिक स्मशान घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहे.













Discussion about this post