नागपूर : तुलसीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TGPCET), नागपूर येथे महाराष्ट्र उद्यमिता विकास केंद्र (MCED), नागपूर उपकेंद्राच्या सहकार्याने दिनांक २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान उद्यमिता जागरूकता शिबिर (Entrepreneurship Awareness Camp – EAC) २०२५ चे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचा दृष्टिकोन निर्माण करणे तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व ज्ञान प्रदान करणे हा होता.
शिबिराचे उद्घाटन २० मार्च रोजी मुख्य अतिथी श्री चक्रधर डोडके (मुख्य वक्ते), प्राचार्य डॉ. पी.एल. नाकतोडे, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. नितिन चोरे, इनक्यूबेशन सेंटरचे प्रमुख व EDC समन्वयक प्रा. अनुप बगाडे तसेच MCED कार्यक्रम समन्वयक सौ. सुषमा भटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी डॉ. नाकतोडे यांनी उद्यमशीलतेचे आर्थिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिरात उद्यमिता क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी एमएसएमई विकास, व्यावसायिक संधी, उत्पादन निवड, ब्रँडिंग, कायदेशीर प्रक्रिया, वित्तीय नियोजन व शासकीय निधी योजनांवर मार्गदर्शन केले. सत्रांचे संचालन श्री चक्रधर डोडके, श्री भीमराव रंगारी, सौ. भारती नेरलवार, डॉ. एस.एन. पठाण, सौ. सीमा मेश्राम आणि श्री एच.आर. वाघमारे यांनी केले. वक्त्यांनी त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
संवादात्मक सत्रांमुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधता आला आणि स्टार्टअप इकोसिस्टमची सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि TGPCET व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड-पाटील, उपाध्यक्ष आकाश गायकवाड-पाटील, कोषाध्यक्ष डॉ. संदीप गायकवाड, प्राचार्य डॉ. पी.एल. नाकतोडे व उपप्राचार्य डॉ. प्रगती पाटील यांचे विशेष योगदान लाभले.
Discussion about this post