नागपूर विमानतळावर साधला संवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट घेतली. बावनकुळे यांच्या आईच्या निधनानंतर ही सांत्वना भेट होती. नागपूर विमानतळावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महिला भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत, तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे, ती दिलेली सन्मानाची भेट आहे, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे, ती कायमस्वरूपी राहील हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू, जे वीज बिल माफ केलं आहे ते पर्मनंट राहील असंही ते म्हणाले.
मशालीवर मी जिंकलो याचा मला अभिमान
संभाजीनगरात उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
माझा पक्ष चोरून विजय मिळवला याची लाज वाटली पाहिजे. मात्र नवीन चिन्हे मिळूनही मी लढलो आणि जिंकलो याचा मला अभिमान आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच मी आता संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा जाहीर प्रवेश झाला. छत्रपती संभाजीनगरच्या निप्पणी शिवारात उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. या अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
———-
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये 6 दहशतवादी ठार
अकोल्यातील जवानाला वीरमरण
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये रविवारी (6 जुलै) सलग दुसऱ्या दिवशी चकमक सुरूच आहे. मुदरघम आणि चिनिगम फ्रिसालमध्ये आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेले आहेत. दोन जवान शहीद झाले आहेत. मुदरघममध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची आणि चिनीगाम फ्रिसलमध्ये आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू आहे. आज सकाळी मुदरघममध्ये एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. दरम्यान, जम्मू- काश्मीरात झालेल्या या चकमकीत अकोल्यातील जवानाला वीरमरण आले. अतिरेक्यांच्या गोळीबारात डोक्याला गोळी लागली . काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
—-
धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली
७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
सूरतच्या सचिन पाली गावात शनिवारी धक्कादायक घटना घडली आहे. सहा मजली इमारत कोसळली, त्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. याच दरम्यान, सूरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितलं की, रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत सात मृतदेह सापडले आहेत.
—-
चंद्रपुरात भर दिवसा दुकानात गोळीबार
तीन अज्ञातांकडून हल्ला
चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी वस्त्र भांडारमध्ये आधी बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर दुकानात प्रवेश करत गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले आहेत. तीन अज्ञात हल्लेखोराकडून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वीच चंद्रपुरात गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाला होता.
———-
विधानसभेला 200 आमदार निवडून आणणार
विजय वडेट्टीवारांचा निर्धार
मुख्यमंत्री…. मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका अशा सूचना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच विधानसभेत 200 आमदार निवडून आणू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्याहाड- खुर्द या गावी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदार संघाच्या नवनीनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
———–
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ
मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Discussion about this post