• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, December 28, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home All Bharat

चार महिलांसह सहा जणाचा जागीच मृत्यू

Khabarbat™ by Khabarbat™
June 13, 2024
in All Bharat, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

चार महिलांसह सहा जणाचा जागीच मृत्यू
धामणा येथील चामुंडी येथील घटना

नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिलांसह सहा जणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर धामणा हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे आज सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी घटनास्थळी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
————-
सहा महिन्यात आपलं सरकार असेल
शरद पवारांनी व्यक्त केली आशा
तुमच्या एकजुटीच्या बळावर काहीही अशक्य नाही. तुमचे अनेक प्रश्न असतील, काही सुटले असतील. मी म्हणत नाही शंभर टक्के प्रश्न सुटले, परंतु जे प्रश्न राहिले आहेत. त्या प्रश्नासाठी मी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो. तुमच्यापैकी काहीजण माझ्याकडे या. जे प्रश्न सुटतील ते सुटतील नाहीतर हे राज्य आपले नाही. ते ऐकतील असं वाटत नाही, जर त्यांनी ऐकलं नाही, तर सहा महिन्यात आपलं सरकार असेल. मग मात्र आपले सर्वच प्रश्न सुटतील.” असे मत केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले
———
अज्ञात भरधाव वाहनाने चिरडले
वृद्ध महिलेचा घटनास्थावरच दुर्देवी मृत्यू
बडनेरा नवी वस्ती परिसरातील बसस्थानक समोर राष्ट्रीय महामार्गावर एका सत्तर ते पंचाहत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने चिरडून वाहनासह पोबारा केल्याची घटना आज गुरुवारी रोजी सकाळी दहा वाजता चे दरम्यान घडली.या घटनेत वृद्ध महिलेचा घटनास्थावरच दुर्देवी मृत्यू झाला.
———

वाचण्यासारखी बातमी

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

शब्दांच्या वाटेवरची ‘ती’ आणि ‘तो’

नवेगावबांध येथे शुक्रवारी एकता दौडचे आयोजन

काळजी घेत मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी सहकार्य करावे.

माॅन्सूनचा राज्यातील अनेक भागात प्रवेश
माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान
राज्याच्या काही भागात जोरदार सरी पडत आहेत. तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसतो. माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. माॅन्सूनने काल राज्यातील काही भागात प्रवेश केला होता. माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. पण आज माॅन्सूनची प्रगती केली नाही. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. तर तेलंगणाचा संपूर्ण भागही व्यापला. तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात माॅन्सून पोचला आहे. आज प्रगती नसल्याने माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.
———
विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा
नाना पटोले यांची अपेक्षा
काँग्रेसला राज्यात सत्ता मिळेल की नाही हा विषय महत्वाचा नाही. तर भाजपा सरकारला खाली खेचून राज्याचे चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट आवश्यक आहे. काँग्रेसचे २८८ जागेवर संघटनात्मक काम सुरू आहे.पण आपल्या सहकाऱ्यांनाही फायदा व्हावा हा उद्देश आहे, असे सांगत विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
———
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच
राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ३ पर्यंत इतर कोणीही उमेदवारी अर्ज न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
———
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा
विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले पत्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वरोरा विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यावर २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.
——–
अजितदादांना सोबत घेतल्याने कोणतंही नुकसान नाही
चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन
400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी केल्याने कोणतंही नुकसान नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं .
——————————

ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार
एटीएम वापरकर्त्यांना फटका
एटीएममधून रोख रक्कम काढणे अजून महाग होणार आहे. कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने (CATMI) मोठ्या निधीसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्याची वकिली केली आहे. त्याचा फटका बँक ग्राहकांना, एटीएम वापरकर्त्यांना बसणार आहे.नोटबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांची लाट आली. पण तरीही बाजारात रोखीतील व्यवहारा मोठ्या प्रमाणात होतात. अनेकांना डिजिटल ॲपवर अजूनही विश्वास नाही. अथवा अनेक व्यवहारांसाठी त्यांना रोखीतील व्यवहार आवडतो. त्यासाठी अर्थातच एटीएम हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता एक बातमी समोर येत आहे की, एटीएमवरुन पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क आकारण्यात येऊ शकते. देशातील एटीएम ऑपरेटर्स एटीएम रोख रक्कम काढण्यावर इंटरचेंज शुल्कात वाढीची मागणी करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय देयके महामंडळाला (NPCI) यासाठी साकडे घालण्यात आले आहे.

————————–
भारतीय गोलंदाजाची निवृत्ती
वेगवान गोलंदाज कामरान खान याने केली घोषणा
आयपीएलच्या इतिहासात पहिली सुपर ओव्हर टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे. हा बॉलर आयपीएलमध्ये 2 संघांकडून खेळला होता.भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला वेगवान गोलंदाज कामरान खान याने निवृत्तीची घोषणा केली आहे. कामरानने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टोरी पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे. कामरान अचूक यॉर्कर टाकायचा त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने त्याला ‘टॉरनेडो’ असं नाव दिलं होतं.’टॉरनेडो’ हे वादळाचं नाव आहे. कामरानने आयपीएलमधील 9 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या. इतकंच नाही, तर कामरान आयपीएल इतिहासातील पहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आहे.
———————————-

डोवाल यांची पुन्हा एकदा NSA म्हणून नियुक्ती
कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची पुन्हा एकदा NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. अजित डोवाल पुढील ५ वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर कायम राहणार आहेत. ही एक कॅबिनेट दर्जाची पोस्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इटली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत अजित डोवाल हे देखील जाणार आहेत. मोदींसोबत ते ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होतील.
——————————————–
राज ठाकरेच मनसेचे सर्वेसर्वा
मनसे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड

राज ठाकरे यांची मनसे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. मनसे पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीमध्ये ठरावाला मंजुरी देत सर्वांनी एकमताने राज ठाकरे यांची निवड केली. ठराविक कालावधीपर्यंत कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार आहेत.मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची निवड करण्यात आली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झालीये. राज ठाकरे मनसे पक्षाचे 2023 पासून 2028 पर्यंत अध्यक्ष असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळा नांदगावकर यांनी मांडला. तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरे यांची निवड झाली आहे.
————————————

मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था
वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत, मात्र, इथली दयनीय अवस्था पाहता नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.खल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था झ-
७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला

गुंतवणूकदार झाले मालामाल

शेअर बाजारात बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरने आपल्या गुंतवणूक दारांना छप्परफाड परतावा दिला आहे. हा शेअर अगदी १० महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत २९०० टक्यांनी वधारला आहे. या कंपनीचा शेअर १३ जूनला ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह, २३२०.८० रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये ही तेजी, कंपनीला एक मोठे काम मिळाल्याने आली आहे. बोंडाडा इंजीनिअरिंगला हे काम नवरत्न कंपनी एनएलसी इंडियाकडून मिळाले आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षात ऑगस्टमध्ये आला एनएलसी इंडियाने बोंडाडा इंजिनिअरिंगला ६०० मेगावॅट ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बॅलेन्स ऑफ सिस्टिम वर्कची ऑर्डर दिली आहे. या वर्क ऑर्डरमध्ये ३ वर्षांसाठी ऑपरेशन्स अँड मेंटेनेन्सच्या कामाचाही समावेश आहे.
—————-

विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले पत्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वरोरा विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यावर २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. विशेष म्हणजे, धानोरकर २ लाख ६० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. खासदार म्हणून निवडून आल्याने धानोरकर यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला.
——————–
नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत भीषण स्फोट; सहा जणाचा जागीच मृत्यू … मराठी हेडलाईन्स : राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य ….. छगन भुजबळ यांचा सुनेत्रा पवारांच्या नावाला विरोध असल्याचा सूत्रांचा दावा …. बजरंग सोनवणे पुन्हा जरांगेंच्या भेटीला:खासदारांना एकत्र करून राज्यपालांना भेटणार, सरकारला मागण्या पूर्ण करण्याची विनंती ….. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा यलो अलर्ट: मुंबई शहर आणि उपनगरातही बरसणार सरी, राज्यात मान्सूनची जोरदार बॅटिंग सुरू…. हिंदी बुलेटिन : अग्निवीर योजना को रिव्यू करेगी सरकार… योजना में बदलाव की तैयारी । रद्द नहीं करेंगे नीट पेपर.. ग्रेस मार्क्स वालों को देनी होगी परीक्षा । खांडू ने तीसरी बार अरुणाचल के सीएम, चौना मीन फिर उप मुख्यमंत्री बने… पुणे पोर्शे एक्सीडेंट केस में सरकार पर बड़ा आरोप; विधायक अनिल देशमुख का बड़ा बयान सामने… पुणे पोर्शे कार दुर्घटना मामले में बड़ा खुलासा; रिश्वत लेते अस्पताल के कर्मचारी का CCTV फुटेज आया सामने…. नागपुर में मोबाइल पर PUB G गेम खेलते हुए एक लड़के की तालाब के पंप हाउस मे गिरने से मौत..

धामणा येथील चामुंडी येथील घटना

नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिलांसह सहा जणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे

नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर धामणा हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे आज सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी घटनास्थळी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
—————————-

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. यावेळी लोकसभेवर निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी ५०३ खासदार कोट्यधीश आहेत. देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. अशाच देशातील या दहा सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती आज आपणं जाणून घेऊया.

 

नमस्कार मी प्रियंका आपणं बघत आहात शंखनाद आवाज सत्यचा.

1.डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (Dr. Chandra Sekhar Pemmasani)
आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला आहे. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५७०५ कोटी रुपये आहे. यासोबतच ते या संसदेचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत.

2.कोंडा विश्वेश्वर रेड्डी (Konda Vishweshwar Reddy)
कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकीटावर तेलंगणातील चेल्लेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता. दरम्यान, कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती ४,५६८ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

3.नवीन जिंदाल (Naveen Jindal)
भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचे पुत्र नवीन जिंदाल हे कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आहेत. जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती १२४१ कोटी रुपये आहे. या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. यापूर्वीही ते दोनदा खासदार झाले आहेत.

4.प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी (Prabhakar Reddy Vemireddy)
प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे व्हीपीआर मायनिंग इंफ्राचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७१६ कोटी रुपये आहे. तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. १८ व्या लोकसभेतील ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

5.सीएम रमेश (CM Ramesh)
भाजप नेते सीएम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ली मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते पूर्वी तेलगू देसम पार्टीसोबत होते. त्यांची एकूण संपत्ती ४९७ कोटी रुपये आहे.

6.ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)
भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे वडील आणि ते स्वतः काँग्रेसमध्ये बरीच वर्षे होते. त्यांची एकूण संपत्ती ४२४ कोटी रुपये आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे

7.छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj)
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती ३४२ कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले.

8.श्रीभरत मथुकुमिली (Sribharat Mathukumilli)
श्रीभरत मथुकुमिली विशाखापट्टणममधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २९८ कोटी रुपये आहे. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत.

9.हेमा मालिनी (Hema Malini)
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. त्यांची संपत्ती २७८ कोटी रुपये आहे.

10.डॉ. प्रभा मल्लिकार्जुन (Dr Prabha Mallikarjun)
डॉ. प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री एसएस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे. त्यांची संपत्ती २४१ कोटी रुपये आहे.

आता आपणं जाणुन घेतल देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार.

पुन्हा भेटुयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार

अनिल देशमुखांनी केला खळबळजनक आरोप

 

पोलीस आणि वाहतूक नियम: पालन किंवा अपवाद?

नमस्कार
नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पोलीस स्वतः नेहमीच नियमानुसार वाहन चालवतात का? हा एक वादग्रस्त विषय आहे ज्यावर अनेकदा चर्चा होते. नागपूर शहरात काही घटनांमध्ये, पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे सर्व पोलीस वाहतूक नियम तोडतात असे नाही. अनेक जबाबदार पोलीस आहेत जे स्वतः नियमानुसार वाहन चालवतात आणि नागरिकांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची दखल घेणे आवश्यक आहे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि पोलीस वाहतूक नियम तोडत असल्यास त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणे आवश्यक आहे.

व्हॉइस
काही पोलीस, विशेषतः दुचाकी चालवताना, हेल्मेट न घालता दिसून आले आहेत. हे नागरिकांसाठी वाईट उदाहरण आहे आणि वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. लाल सिग्नलवरून गाडी चालवणे किंवा सिग्नल लाईन पार करणे अशा घटनांमध्येही काही पोलीस सहभागी असल्याचे दिसून आले आहे. काही पोलीस वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे तीन व्यक्तींना बसवताना दिसून आले आहे. काही प्रकरणांमध्ये, पोलीस वाहनांचे आवश्यक कागदपत्रे जसे की विमा, रजिस्ट्रेशन इत्यादी नसताना दिसून आले आहेत. काही पोलीस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी रॉंग साईडवरून गाडी चालवताना दिसून आले आहेत.
अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये नकारात्मक संदेश जातो आणि वाहतूक नियमांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहतूक सुरक्षा सर्वांची जबाबदारी आहे आणि पोलीस आणि नागरिक यांनी मिळून काम करून रस्ते सुरक्षित बनवणे आवश्यक आहे.
————-
माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोहचला

राज्याच्या काही भागात जोरदार सरी पडत आहेत. तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसतो. माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे.

माॅन्सूनने काल राज्यातील काही भागात प्रवेश केला होता. माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. पण आज माॅन्सूनची प्रगती केली नाही. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. तर तेलंगणाचा संपूर्ण भागही व्यापला. तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात माॅन्सून पोचला आहे. आज प्रगती नसल्याने माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.

मागील 24 तासात
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा मध्ये पाऊस नाही.
नागपूर मध्ये तुरळक, अमरावती आणि यवतमाळ मध्ये थोडा पाऊस.
अकोला, बुलढाणा आणि वाशिम मध्ये पाऊस झाला.

मागील २४ तासात तापमान:
नागपूर: 38°C
चंद्रपूर: 38°C
वर्धा: 36°C
गडचिरोली: 31°C
गोंदिया: 39°C
भंडारा: 37°C
अमरावती: 33°C
यवतमाळ: 32°C
अकोला: 33°C
वाशिम: 34°C
बुलढाणा: 31°C

भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात १६ जून पर्यंत भंडारा जिल्ह्यात ढगाळ, हलका पाऊस, मेघगर्जना वादळ येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विज, मेघगर्जना वादळ, मध्यम पाऊस, गडचिरोली जिल्ह्यात विज, मेघगर्जना वादळ, हलका ते मध्यम पाऊस
गोंदिया: विज, मेघगर्जना वादळ, हलका पाऊस.. नागपूर: वादळ, विज, हलका पाऊस येईल आणि तापमान 42°C पर्यंत राहील

भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात म्हणजेच 12 ते 16 जून दरम्यान आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे 12 ते 13 जून दरम्यान विधानसभा कळकळत मेघगर्जना वादळ वारा आणि हलक्या पावसा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 12 ते 13 जून दरम्यान विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळवारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे 15 ते 16 जून दरम्यान तुरळक अनेक दोन ठिकाणी विधानसभेत वादळ आणि मी गर्जना तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13 जून रोजी विजांचा कडकडाट मिक्स गर्जना वादळ वारा तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे तसेच 14 ते 16 जून दरम्यान तुरळ आणि दोन ठिकाणी विजांचा कडकडाट गर्जना वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे..

गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट मेकर गर्जना वादळ वारा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे 16 जून पर्यंत आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 41 अंश पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये वादळ वारा विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता आहे 16 जून पर्यंत आकाश अंशिक ढगाळ राहून तापमान 42 अंश ते 42.9° पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शनिवारी, रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Post Views: 1,074
SendShareTweetScan
Previous Post

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा | Pratibha Dhanorkar

Next Post

अजय जोगे यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर व्याख्यान

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तुमच्या घरी बंदूक किंवा शस्त्रास्त्र नाही ना! आपच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी झडती

अनिल देशमुख पर हुआ हमला ‘फर्जी’; पुलिस ने बताया ‘झूठ’, बंद की जांच

October 1, 2025
0
नागपूरमध्ये भारतातील सर्वात मोठं डिझाईन प्रदर्शन

नागपूरमध्ये भारतातील सर्वात मोठं डिझाईन प्रदर्शन

September 30, 2025
0
ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार; 15 कोटींची….

September 26, 2025
0
TGPCET, Nagpur Organizes Campus Recruitment Drive for Transrail Lighting Ltd.

TGPCET, Nagpur Organizes Campus Recruitment Drive for Transrail Lighting Ltd.

September 22, 2025
0
Load More
Next Post
अजय जोगे यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर व्याख्यान

अजय जोगे यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर व्याख्यान

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025

Recent News

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
0
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
0
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
0
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025
किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

November 21, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL