सोशल मीडिया म्हटलं की फोटो, व्हिडीओ, माहितीची देवाणघेवाण होते. पण, लिंकडइन असे माध्यम आहे, त्याला अपवाद आहे. जे छंद, सिनेमे, संगीत वगैरेला लिंक्डइनवर विशेष महत्त्व दिले जात नाही. प्रोफाइल तयार करत असताना येथे चालू आणि पूर्वीची नोकरी, जॉब टायटल, कंपनी, क्षेत्र, तारखा आणि नोकरीविषयीची थोडक्यात माहिती भरावी लागते. तसेच एखाद्या संकेतस्थळाशी वापरकर्ता संबंधित असेल तर त्या संकेतस्थळाची लिंक ही या प्रोफाइलमध्ये देता येते.
२००२ मध्ये, रीड हॉफमन, एलन ब्लूम, एरिक लि आणि जस्टिन सिली यांनी लिंकडइनची स्थापना केली. त्यांनी एका अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मची कल्पना केली जिथे व्यावसायिक एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील. त्यावेळी, ऑनलाइन नेटवर्किंगसाठी फारच कमी पर्याय उपलब्ध होते.लिंक्डइनने व्यावसायिकांसाठी प्रोफाइल तयार करण्याची, कनेक्शन स्थापित करण्याची आणि नोकऱ्या शोधण्याची सुविधा दिली.
लिंक्डइन तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांशी कनेक्ट होण्यास मदत करते. हे तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी शोधण्यास, तुमचे नेटवर्क वाढवण्यास आणि तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकते. तुम्ही तुमचा लिंकडइन प्रोफाइल तुमच्या व्यावसायिक ब्रँडची जाहिरात करण्यासाठी वापरू शकता. हे तुम्हाला तुमच्या कौशल्यांवर प्रकाश टाकण्यास, तुमची उपलब्धता दर्शविण्यास आणि तुमच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून तुमची प्रतिष्ठा निर्माण करण्यास मदत करू शकते. लिंकडइन तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड आणि विकासांबद्दल जाणून घेण्यास मदत करते. तुम्ही लेख, व्हिडिओ आणि इतर शैक्षणिक माहिती पोस्ट करू शकता. प्रामुख्याने नोकरी शोधणे आणि कर्मचारी मिळविणे यासाठी जास्त वापर होतो. लिंक्डइनवर रेझ्युम अपलोड करून ठेवता येतो. जो आपल्या शिक्षण, अनुभव आणि इच्छित नोकरीसाठी पात्र ठिकाणी, तुमच्या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी ऍलर्ट प्राप्त होते. एखाद्या कंपनीत रिक्त जागा असतील आणि ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट अधिकारी समान स्किल असणाऱ्या व्यक्तीला शोधत असतील, तर या माध्यमातून लवकर माहिती देणे सोयीचे झाले आहे.
व्यवसायासाठी नवीन ग्राहक आणि भागीदार शोधण्यासाठी लिंक्डइन वापरू शकता. उत्पादन किंवा सेवांच्या जाहिरात करण्यासाठी आणि तुमच्या उद्योगातील इतर व्यावसायिकांशी कनेक्ट होण्यासाठी फायदेशीर आहे. लिंकडइन हे व्यावसायिकांसाठी एक मौल्यवान साधन आहे जे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास आणि यशस्वी होण्यास मदत करू शकते. त्यामुळे आजच आपले खाते सुरु करा आणि जगाशी कनेक्ट व्हा!
Discussion about this post