सुधीर मुनगंटीवार यांचा मुहूर्त ठरला; या तारखेला भरणार अर्ज
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुंनगटीवार (sudhir mungantiwar) हे २६ मार्च रोजी अकरा वाजता गांधी चौकातून नामांकन भरणार आहेत. माझी उमेदवारी हे कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नसून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करण्यासाठी नाही; या लोकसभेच्या विकासाचा विजय व्हावा विकासाची गती वाढावी, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. (loksabha election 2024)
आज २४ मार्च रोजी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून चंद्रपूर, वाणी या परिसरातील पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, नामांकन भरताना माझ्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या वतीने श्री राजेंद्र जैन, शिवसेनेच्या वतीने नागपूर विभागाचे प्रमुख किरण पांडव व आरपीआय आठवले गट आरपीआय जोगेंद्र कवाडे यांचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
आवेदन अर्ज दाखल करण्यासाठी माझ्यासोबत या आशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी राहणार आहे. आवेदन भरल्यानंतर आपल्या सर्वांची त्या त्या दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष भेट घेण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले. (loksabha election 2024)
पुढे ते म्हणाले, विश्व गौरव, देशगौरव, युगपुरुष श्री नरेंद्र मोदीजीं, अमित शहा व जे. पी. नड्डा यांनी आग्रह पूर्वक ही उमेदवारी मला दिली. 1989 मध्ये मी आयुष्यात महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना पहिली लोकसभा लढवली. दुसऱ्या निवडणुकीत 91 मध्ये सामोरे गेलो. पण साधारणतः 1995 पासून आजच्या क्षणापर्यंत मी चंद्रपूर विधानसभेतून तीनदा आमदार झालो व तीनदा बल्लारशा विधानसभेची सेवा करण्याची संधी दिली. आज 34 वर्षानंतर मी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. ही 18 वी लोकसभा हे निश्चितपणे इतर 17 लोकसभेपेक्षाही विकासाची गती त्याचा संकल्प हा माननीय मोदीजींच्या शब्दातून व्यक्त होतांना आपण सर्वजण बघतो.
माझं राजकारण हे जातीपाती, धर्माचे, रंगाचं, वंशाचं राहिलं नाही. माझ्या कार्यालयात जो कोणी व्यक्ती समस्या प्रश्न घेऊन आला. मी जात पात, पक्ष न पाहता त्याचं काम केलं. जो अधिकार जनतेने विधानसभेत निवडून मला दिला, त्या अधिकाराचा मी सर्वोत्तम उपयोग केला. विधानसभेत विधिमंडळाचे सर्व आयुध वापरत मला विधानभवनाने सरकारने स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधानसभा अध्यक्षानी गौरव केला.
केंद्र सरकारच्या योजना गावापर्यंत पोहोचवणं, राज्यामध्ये असणारा 29- 30 वर्षाचा अनुभव व परिचय या माध्यमातून गावागावात या योजना पोहोचवत, त्या गावाचा सर्वंकष सर्वांगीण विकास करण्याचा मी संकल्प केला, असेही त्यांनी सांगिलते.
कामाची काही ठळक वैशिष्ट्ये:
- ISO प्रमाणित मंत्री कार्यालय: देशात पहिल्यांदाच मी ISO प्रमाणित मंत्री कार्यालय स्थापन केले. यामुळे कार्यालयातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाली.
- डॅशबोर्ड यंत्रणा: गावातील लोकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी मी एक डॅशबोर्ड आणि आवाज दो यंत्रणा विकसित करणार आहे.
- सामाजिक कार्य: माझ्यासाठी सामाजिक कार्य हे नेहमीच प्राधान्यक्रमाने असले आहे. मी गरीब रुग्णांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली आहेत आणि दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत.
- सर्वांसाठी समान: मी कोणत्याही धर्म, वंश, वय, उंची किंवा वजन यांच्या आधारावर भेदभाव करणार नाही. चंद्रपूर लोकसभेतील प्रत्येक मतदार आणि त्याच्या कुटुंबाची सेवा करणे हे माझे ध्येय आहे.
- प्रतिज्ञा पूर्ण करणे: मी कधीही बनावट राजकारण केले नाही आणि मी दिलेला शब्द नेहमी पाळला आहे. 1995 मध्ये मी पहिल्यांदा विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडून आलो तेव्हा मी जे वचन दिले होते ते पूर्ण केले.
आज मी तुम्हा सर्वांकडे विनंती करतो की तुम्ही मला पुन्हा एकदा निवडून द्या आणि मला तुमच्या गावाचा, तुमच्या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्या.
धन्यवाद!
Discussion about this post