*इको-प्रो कडून जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन*
*फेब्रुवारीचा शेवटचा रविवार गड-किल्लेप्रेमी कडून पूजन व पार्थना*
*चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यावर एकाचवेळी पूजन*
चंद्रपूर : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करत पार्थना करीत असतात, या दिवसाचे निमित्त साधून ‘इको-प्रो’च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन आज एकाचवेळी सकाळी गड पूजन केले.
इको-प्रो संस्था जिल्ह्यातील किल्ले संरक्षण व संवर्धनकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुद्धा राबविले, यातून आता किल्ला पर्यटन ‘चंद्रपूर हेरिटेज वॉक’ सुद्धा सुरू झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील विविध गड-किल्ले संवर्धन करिता सुद्धा प्रयत्न सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड-दुर्ग प्रेमी किल्ल्यावर एकत्रित येत पूजन करतात आणि पार्थना करतात की “हे किल्ला स्वरुपी देवतांनो, त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझे संरक्षण करण्याची, ते आम्ही केले पाहिजे. जेथे-जेथे संवर्धन कार्य चालू आहे, तेथे अशी कोणतेही दुर्घटना घडू देऊ नकोस, कि ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य, दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृध्दी दे व त्याच्या आरोग्याची काळजी घे. हिच तुझ्या चरणी माझी प्रार्थना.
अशी पार्थना करीत आज चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यावर पूजन करण्यात आले. चंद्रपूर येथील परकोट किल्ल्यावर पठाणपुरा गेट वर बंडू धोतरे यांचे नेतृत्वात योजना धोतरे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, कपिल चौधरी तर बल्लारपूर येथील किल्ल्यावर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जैस्वाल आणि भद्रावती येथील किल्ल्यावर भद्रावती इको प्रो सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, दिपक कावटे, राहुल सपकाळ, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले व माणिकगड किल्ल्यावर सुनील लिपटे, सुधीर देव, राजू काहिलकर, संजय सब्बनवार आदी कार्यकर्ते यांनी पूजन केले.
Discussion about this post