*नवा वर्ष, नवी आशा*
नवा वर्ष ,नवी आशा
नवे स्वप्न ,नवी दिशा
गगनभरारी घ्यावी
द्यावी सोडून निराशा
पंख मिळावे नविन
यावे स्वच्छंदी जगता
जावे दिवस आनंदी
असे बघता बघता
वर्ष येतील नविन
लाभो आरोग्य निरोगी
दीर्घायुष्य सकलांना
नवा संकल्प हा योगी
लाभो सुख समाधान
वाट धरू प्रगतीची
नवा वर्ष ,नवी आशा
साथ प्रकाश ज्योतीची
नवे मनात संकल्प
माणुसकी खरा धर्म
नवे वर्ष , नवा हर्ष
घडो हाताने सत्कर्म
वाटू आनंदाचे वान
मुखावर येई हास्य
जगण्याची रीत नवी
घ्यावे जाणून रहस्य
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post