धामणगाव रेल्वे –
सिंधूताई सपकाळ यांचे सुपुत्र श्री.अरुणजी सपकाळ यांच्या हस्ते धामणगाव रेल्वे येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.
माणूस म्हटलं तर समाज आलेच. त्या शिवाय आपण राहू शकत नाही.जीवनात कोणती वेळ कधी येईल हे सांगणे शक्य नाही. देवा सोबत आपण देव रुपी डॉ. सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानले पाहिजे असे मत सामाजिक सेविका सौं. सिमाताई मेश्राम यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे रंगोली हॉल येथे आयोजन करुन कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्याचे दी. 20 डीसेबंरला प्रमुख अतिथी परमपूज्य सिंधूताई सपकाळ यांचे सुपुत्र श्री. अरुणजी सपकाळ,धामणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश साबळे,डॉ. आशिष सालणकर,डॉ. सौ.प्रज्ञा पाटील यांचे शालश्रीफळ देऊन गौरविण्यात आले तसेच मुख्याध्यापक संदेश नखाते,संघटीत युवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय सायरे ,विरनायकचे संपादक राजू गायकवाड, सौ जायले ताई,श्री.पुंडलीक मेश्राम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी कधी खूप मोठ मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आणि अशा परिस्थितीत व्यक्ती खूप हताश होऊन जातो, तेव्हा काही देवरूपी माणसे खूप मोलाची कामगिरी करून जातात आणि हे मोल म्हणजेच संकट काळी केलेली मदत होय. एक म्हणजेच आपले आदरणीय मुख्याध्यापक श्री. नखाते सर आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना सौ.अंजली कडू आपले मत व्यक्त केले.
Discussion about this post