सोलर एक्स्प्लोसिव्हमध्ये स्फोट, ९ कामगार मृत्यूमुखी
नागपूर : अमरावती मार्गावर बाजारगाव येथीळ सोलर एक्स्पोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. मृत कामगारांमध्ये ६ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. या कंपनीत स्फोटके तयार केली जातात. या घटनेत अनेक मजुरही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाला. कंपनीत तयार झालेल्या स्फोटकांच्या पॅकिंगचे काम सुरु असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता. त्यामुळे काही कामगार घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.
नागपूर अमरावती रोडवरील (Nagpur Amravati Road) सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती आहे. तब्बल नऊ जण या स्फोटात मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत.
आमदार अनिल देशमुख म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर स्फोटातील मृतांना पाच लाखांची मदत- फडणवीस
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्कात आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असं ट्वीट फडणवीसांनी केलं आहे.
Discussion about this post