ST BUS Android Ticket Issuing Machine
डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट
वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स सेवेत दाखल
[tta_listen_btn]
चंद्रपूर, दि. 14 : एसटीतून प्रवास करतांना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशाची चिंता नसावी यासाठी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येईल अशा सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय किंवा क्युआरकोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.
मे.ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळात सर्व वाहकांसाठी नवीन अँड्रॉइड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशीन घेण्यात आल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यादृष्टिकोनातून, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे.
अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकांसोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकते. युपीआय पेमेंटद्वारे किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स (ATIM) सेवेत दाखल केली आहेत. या मशीन्सद्वारे आता प्रवाशांना डिजिटल पद्धतीने तिकीट खरेदी करता येणार आहे.
या मशीन्समध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय अॅप आणि ई-मनी अशा विविध पर्यायांद्वारे पैसे भरता येतील. यामुळे प्रवाशांना खिशात पैसे नसतानाही एसटीने प्रवास करता येणार आहे. या मशीन्सद्वारे प्रवासी त्यांच्या प्रवासाचा मार्ग, तिकीटची किंमत, बसचे क्रमांक आणि वेळ यासारख्या माहिती देखील पाहू शकतील. यामुळे प्रवाशांना प्रवासाबद्दलची सर्व माहिती मिळेल.
MSRTC ने या मशीन्सची चाचणी नागपूर आणि पुणे विभागात केली आहे. या चाचणीमध्ये या मशीन्स उत्तम कामगिरी करत असल्याचे आढळून आले आहे. या मशीन्समुळे प्रवाशांना एसटीने प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच, या मशीन्समुळे तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. MSRTC ने या मशीन्सचा वापर राज्यातील सर्वच एसटी वाहकांमध्ये करण्याचे नियोजन केले आहे.
Discussion about this post