टपोऱ्या डोळ्यात तूझ्या
वसला गं माझं गाव
काय सांगू लोकांना
आपल्या प्रेमाचा नाव
टपोऱ्या डोळ्यात तूझ्या
जीव माझा घुटमळतो
कळतच नाही मी त्यात
एकटक असं का पाहतो
टपोऱ्या डोळ्यात तूझ्या
आज इशारे समजले
त्या इशाऱ्यांना बघताच
प्रेम मनात उमजले
टपोऱ्या डोळ्यात तूझ्या
आयुष्य माझे सुखावले
सात जन्माचे नाते कसे
आपले ईश्वराने जोडले
सखे , टपोरे डोळे तुझे
मला खूप काही सांगतात
मनातील भावना माझ्या
अलगत च उलगडतात
टपोऱ्या डोळ्यात तूझ्या
दुष्ट लागू नको कधी
सहवास हवा मला तुझा
हो ना गं तू माझी आधी
टपोरे डोळे बघून तुझे
मी ही कविता रचलो
कविताच्या शब्दामध्ये
मी तुलाच तर शोधलो
कवी अजय दशरथ राऊत
Discussion about this post