प्रणू चाराक्षरी
*अहंकार*
***************
दूर ठेवा
अहंकार
जीवनाला
द्या आकार..१
नाश करी
आयुष्याचा
सारा व्यर्थ
आनंदाचा..२
वाढे क्रोध
चिडचिड
अशांतता
जणू कीड..३
सार्थ करू
दूर ठेवू
अहंकारा
तमा देवू..४
कोणाचेच
भले नाही
राव रंक
कर्म पाही..५
व्यक्तीमत्व
घडवूया
अहंकारा
पळवूया..६
हर्ष येई
जगण्याला
किर्तीवान
मानवाला..७
*****************
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post