मोद काव्य
विषय:- गणेशा
******************
….
देवा
श्री गणेशा
प्रथम वंदन
दूर सारी दुःख क्लेशा
तूच
गणाधीश
ओंकार स्वरूपा
भक्त ठेवतो आशिष
बाप्पा
सकलांचा
मोरया मोरया
गजर चाले भक्तांचा
माथा
तुझ्या पायी
गुणगान तुझे
लंबोदर रुप ठायी
देतो
गणराया
मोदक प्रसाद
ठेवा मांगल्याची काया
हार
चढवितो
दुर्वा जास्वंदाचा
विघ्नेश भक्तां पावतो
******************
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post