*क्षण आला विसर्जनाचा*
क्षण आला विसर्जनाचा
मन भरून आले
साठलेल्या अश्रुधारा
डोळ्यांतून वाहिले
तू असताना सोबती
घरी आनंद दरवळे
तू जाताना गणराया
हात माझे थकले
तुझे गुणगान गाऊन
मी नाही थकलो
तूझे रुप साजिरे
बघून मी सुखावलो
तुला विसर्जनाला नेताना
पाय माझे उचलत नाही
लहान थोर सगळेच
नाचत नाचत जाई
मन मोठे करून
तुला नेतो विसर्जनाला
पुढल्या वर्षी लवकर
येणार समजावितो मनाला
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post